आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यातील पूजाचा खून; लष्करी जवान पतीला जन्मठेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- लातूर जिल्ह्यातील बाेरफळ वाडा येथील रहिवासी पूजा हिची तिचा पती विष्णुदास राठाैर याने हत्या केली हाेती. या प्रकरणी मुलीच्या अाई- वडिलांनी अाधी फिर्याद दिली, मात्र नंतर न्यायालयात जबाब फिरवला. मात्र, तरीही प्रत्यक्षदर्शींची साक्ष महत्त्वपूर्ण मानून न्यायालयाने लष्करी जवान असलेल्या अाराेपी विष्णुदासला जन्मठेप व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास एक वर्षाची अाणखी शिक्षा त्याला भाेगावी लागेल.  


पंजाबच्या जालंधरमध्ये लष्करी जवान विष्णुदास राठाैर अापली पत्नी पूजासह राहत हाेता. हे दाेघेही लातूर जिल्ह्यातील रहिवासी. २९ एप्रिल २०१३ राेजी त्यांचा विवाह झाला हाेता. या दांपत्याला दाेन मुलीही अाहेत. मात्र, पती विष्णुदास हा पूजाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. 


यातूनच १७ सप्टेंबर २०१६ राेजी त्याने पूजाचा गळा दाबून खून केला हाेता. याप्रकरणी पूजाच्या अाई- वडिलांनी जावयाविराेधात तक्रार दिली हाेती, त्यावरून विष्णुदासला अटकही झाली हाेती. मात्र, नंतर न्यायालयात पूजाच्या अाई- वडिलांनी जबाब फिरवला. मात्र, राठाैर यांच्या शेजारी राहणारी मुलगी माेनिका हिने विष्णुदास अापल्या पत्नीला नेहमी बेदम मारहाण करायचा, अशी साक्ष दिली हाेती. 


१७ सप्टेंबर राेजी घरात काेणी नसताना अाराेपीने पूजाला बेदम मारहाण करून तिच्या गळ्यावर पाय दिला हाेता, हे दृश्य मी खिडकीतून पाहिले हाेते, असेही माेनिकाने न्यायालयात सांगितले. ही बाब तिने अापल्या अाईला फाेनवरून सांगितली हाेती. दरम्यान, शवविच्छेदन अहवालात पूजाचा मृत्यू मानेची शीर तुटल्याने झाल्याचे स्पष्ट झाले हाेते. त्या अाधारे काेर्टाने विष्णुदासला दाेषी ठरवले.

बातम्या आणखी आहेत...