आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबडमध्ये वादळासह रिमझिम; बस घसरली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीर्थपुरी -   पावसाचा शिडकावा झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते. अरुंद रस्ता व साइड पंखे खोल व चिखलामुळे बसचे पाठीमागचे चाक रुतल्याने रस्त्याच्या कडेने बस गेली होती. परंतु, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.    


मंगळवारी दुपारी अंबड ते जालना मार्गावर शेवगा गावाजवळ वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. अरुंद रस्ता व साइड पंखे खोल असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाला साइड देताना (एमएच २०, बीएल १७६०) ही एसटी बस रस्त्याच्या खाली घसरली.  चालकाने प्रसंगावधान राखत एसटीवर नियंत्रण मिळवले.   या मार्गावरील वाहतुकीचा २ तास खोळंबा झाल्याचे प्रवासी रवींद्र बोबडे यांनी सांगितले.

 

झाड पडल्याने वाहतूक २ तास खोळंबली 
अंबड रोडवरील गोलापांगरी फाट्याजवळील वाळलेला वृक्षाचे झाड रस्त्यात आडवे पडल्यामुळे मंगळवारी २ तास  वाहतूक खोळंबली होती.  अंबडकडील काही भागात रिमझिम पाऊस झाला. जिल्ह्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण होऊन वारे वाहू 
लागले होते.

बातम्या आणखी आहेत...