आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शांताबाई कोटेचा म्हणतात, महिला शिकल्या, पण प्रगती कमी;बीडच्या पहिल्या महिला अामदार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांताबाई काेटेचा - Divya Marathi
शांताबाई काेटेचा

बीड- मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्रामध्ये  समायाेजन झाल्यानंतर १९५६ च्या पहिल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बीड मतदारसंघातून पाच हजार मते घेत  बीडच्या पहिल्या अामदार हाेण्याचा मान शांताबाई रतनलाल काेटेचा यांनी मिळवला.  


स्वातंत्र्यानंतरच्या काळातील राजकारण हे विकासाभिमुख व विराेधकांना िवचारात घेऊन चालत हाेते. बीडमध्ये काँग्रेसच्या अामदार असताना जिल्हा विकास मंडळ स्थापना करण्याचे महत्त्वपूर्ण काम  त्यांनी केले. सध्याच्या स्थितीत  महिला िशक्षित झाल्या, पण प्रगती कमीच दिसत असून  लाेकसभा, विधानसभेसह सर्वच निवडणुकांमध्ये ५० टक्के जागा महिलांसाठी अारक्षित असाव्यात. महिलािवरुद्ध महिलाच लढणे गरजेचे. असे झाल्यावरच महिला  कारभाऱ्यांच्या माध्यमातून देश लवकर महासत्ता हाेईल, असे   माजी आमदार शांताबाई काेटेचा यांनी  सांगितले.  बीडचे मूळ रहिवासी असलेले  रतनलाल काेटेचा यांचे घर  पेठ बीड भागात अाहे.  स्वातंत्र्यपूर्व काळापासून काेटेचा कुटुंब महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कांॅग्रेसमध्ये कार्यरत हाेते. तर शांताबाई यांचे मूळ  पुणे जिल्ह्यातील  सासवड माहेरचे सर्व सदस्यही  काँग्रेसमध्ये कार्यरत होते.  दाेन्ही कुटुंब   स्वातंत्र्यासाठी  काम करत असल्याने शांताबाई यांचा विवाह १९४२ साली सुखलाल काेटेचा यांच्याशी झाला.    स्वातंत्र्यानंतर  मराठवाडा  हैदराबाद  संस्थानात हाेता. यात  १९५१ च्या पहिल्या विधानसभा  निवडणुकीत रतनलाल काेटेचा  हे काँग्रेसकडून अामदार झाले. नंतरच्या काळात मराठवाड्याचे संयुक्त महाराष्ट्रात  समायाेजन झाले. १९५७ च्या विधानसभेच्या  निवडणुकीत काँग्रेसकडून शांताबाई काेटेचा तर शेतकरी कामगार पक्षाचे श्रीपतराव कदम यांच्यात लढत झाली. पाच हजार मतांनी शांताबाई काेटेचा विजयी झाल्या हाेत्या.

 

वाजपेयी सर्वांना सोबत घेऊन चालत असत   
राजकारणामध्ये सध्या  विसंगत चित्र आहे. तत्कालीन पंतप्रधान   वाजपेयी हे सर्वांना साेबत घेऊन चालत. विराेधकांचे विचार एेकून  घेत त्यांच्या मुद्यांना जाहीर संमती  देत. मात्र सध्याचे पंतप्रधान नरेंद्र  माेदी हे भाजपमधील लाेकांचे एेकतात का हा प्रश्न अाहे. 

 

महिलेविरुद्ध महिलाच हवी  
देश महासत्ता हाेण्यासाठी खेडेगाव -दिल्लीपर्यंत महिला कारभारी असणे गरजेचे अाहे.  सर्वच निवडणुकांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण असावे. निवडणुकीत महिलेविरुद्ध महिलाच उभी राहणे अावश्यक अाहे, असेही  त्या म्हणाल्या. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समवेत शांताबाई काेटेचा...     

बातम्या आणखी आहेत...