आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवासी क्षमता 10, पैशांसाठी नाविकाने बसवले 29 जण; नाव उलटल्यावर पाेलिसाची सतर्कता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव - प्रवासी नावेत बसवण्यास सुरुवात झाली. प्रवाशांचा  आकडा २० वर गेला तेव्हाच आम्ही चालकाला इतक्या प्रवाशांना बसवणे धोकादायक असल्याचे सांगत होतो. मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्याने पाण्यात नाव घातली. थोडे अंतर गेल्यावर नावेने हेलकावे घेतले अन् काही कळण्याच्या आतच ती उलटून सर्व प्रवासी पाण्यात फेकले गेले. यात महिलांची संख्या मोठी होती.  पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीमुळेच आमचे प्राण वाचले, अशी आपबिती गणेश थेटे यांनी सांगितली.


माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत भगवान पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर आहे. अधिक मासात पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे व गंगास्नानाचे विशेष महत्त्व असल्याने देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.  जालना जिल्ह्यातील भाविकही गोळेगाव मार्गे गोदापात्रातून नाव अथवा कलहीतून येतात. प्रशासनाने यात्रेनिमित्त गोदापात्रात  नाथ सागरातून पाणी साेडल्याने पात्र दुथडी भरून वाहत आहे. सोमवारी पुरुषोत्तमपुरीत गोदावरीमार्गे नावेतून जाणाऱ्या भाविकांची नाव उलटली. गणेश थेटे त्यांच्यापैकीच एक.

 

नवख्या नाविकामुळे अपघात
उलटलेली नाव गोळेगाव येथील नावाडी  दादाराव सोपान बिजुले  यांची आहे. ते  डिझेल आणण्यासाठी गावात गेलेले असताना प्रवासी जमलेले पाहून त्यांचा दुसरा सहकारी कैलास इंगोले याने २८ प्रवाशांना घेऊन नाव नदीपात्रात घातली. काही अंतरावर गेल्यावर हेलकावे खाणाऱ्या नावेवर त्याला नियंत्रण न मिळवता आल्याने ती उलटून प्रवासी पाण्यात कोसळले.

 

नाविकासह २९ जण नावेत
प्रवासी वाहतूक करणाऱ्या इंजिनावर चालणाऱ्या होड्या जालना जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांची ने आण करतात. मात्र, अधिक पैशांच्या हव्यासापोटी क्षमतेेपेक्षा अधिक भाविकांना नावेत बसवले जाते.   प्रति प्रवासी दहा रुपये तिकीट आकारले जाते. सोमवारी झालेल्या घटनेत नावेची क्षमता केवळ दहा प्रवाशांची असताना चालकासह तब्बल २९ जण या नावेत होते.

 

स्थानिक रुग्णालयात उपचार
या अपघातात काही जण बेशुद्ध झाले तर काहींच्या नाकातोंडात पाणी गेले. काहींचा रक्तदाबही वाढला. त्यामुळे सर्वच रुग्णांना पुरुषोत्तमपुरीतील डॉ. भागवत पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे सर्वांवर प्रथमोपचार करण्यात आले.

 

ना नियमावली ना कुठे नोंद
पुरुषोत्तमपुरीत चालणाऱ्या होड्या व नावांची  कोणत्याही दफ्तरी नोंद नाही.  तर त्यांच्यासाठी काही नियमावली असेल तर तिचे कुठे पालनही होत नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

 

हे भाविक  बचावले
मंदाकिनी सुरवसे , शालन  सुरवसे, गंगाराम लहाने, सविता घायाळ, अश्विनी  घायाळ, चंद्रकला  घायाळ, इंदुबाई  घायाळ, राजेभाऊ  घायाळ, सावित्रा घायाळ, उमा घायाळ, अरुणा घायाळ, मीरा  मोगल, सुदामती साखवकर,गंगुबाई सुरवसे, मुक्ताराम  लहाने, गीता  कांबळे, विजयमाला  भुंबरे, बालासाहेब  भुंबरे, आशामती  लहाने, प्रयागबाई  चव्हाण   सर्व रा. रेवलगाव ता.परतूर आणि वच्छलाबाई  शिंदे, संगीता थेटे, अनिता पवार, प्रियंका  पवार, प्रांजल  पवार, अभिषेक थेटे व गणेश  थेटे (रामनगर कारखाना, जळगाव) हे बचावले. केवळ दैव बलवत्तर म्हणून २८ भाविक बचावले.

 

अपघातग्रस्त नावेवर शासनाचे नाव ?
अपघातग्रस्त नावेवर चक्क महाराष्ट्र शासन लिहून खाली जिल्हाधिकारी कार्यालय सांगली,  असे स्पष्ट लिहिलेले असताना मागील महिनाभरापासून ही नाव गोदापात्रात  सोपान दादाराव बिजुले हा नाविक खासगीत कसा नाव चालवत होता, हे एक कोडे आहे. दरम्यान, संतप्त जमावाने नावेची तोडफाेड केली.

 

पुढील स्‍लाइडवर...मोरेंंचे प्रसंगावधान...

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...