आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद निवडणुक: शिवसेेनेच्या ‘एकला चलो रे’मुळे भाजपची होणार गोची

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने एकला चलो रे ची भूमिका घेण्याचे स्पष्ट संकेत दिले असल्याने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपची गोची होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. भाजपने या जागेसाठी शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची बोलणी केलेली नाही.  तर शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरून  उमेदवार उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष शिवसेनेच्या भूमिकेकडेच आहे.  


परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ पूर्वीपासूनच युतीमध्ये भाजपकडे आहे. दोन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांत या दोन्ही पक्षांचे फारसे सदस्य नाहीत. परिणामी विजयासाठी आवश्यक तो मतदान कोटा कधीच पूर्ण होत नाही. त्याही पेक्षा निवडणुकीतील घोडेबाजार दर वेळेलाच वधारत असतो. त्यातून सदस्यांचे चांगभले होते. भाजपने प्रत्येक वेळी ही निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला. परंतु  अपयशच पदरी पडले. २०१२ पूर्वीच्या या निवडणुकीत भाजपचा मोठ्या मताधिक्याने दारूण पराभव झाला. केवळ २०१२ च्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार केवळ २४ मतांनी पराभूत झाला. याला कारणही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजीमुळे भाजपची मते 
वाढली होती.  

 

काँग्रेस आघाडीचेच राहिले प्राबल्य
शिवसेनेने या निवडणुकीकडे फारसे लक्ष दिल नाही. भाजपनेही सोपस्कारच पार पाडला होता. त्यामुळे दोन्ही काँग्रेसचेच प्राबल्य राहिले. या वेळी शिवसेना व भाजपत स्थानिक पातळीवरच वाद आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्याच्या दौऱ्या दरम्यान खा. जाधव यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांंच्या कार्यक्रमावर शिवसेनेने बहिष्कार टाकला होता. 

 

शिवसेना कोण उमेदवार देणार
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या विधान परिषद निवडणुकीत एकला चलो रे ची आपली भूमिका कायम ठेवत नाशिक व कोकणातून उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे याही मतदारसंघात शिवसेनेची भूमिका निश्चितच वेगळी राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेना कोण उमेदवार देणार याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

 

बातम्या आणखी आहेत...