आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणरणत्या उन्हात धनंजय मुंडेंचे तीन गावांत श्रमदान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी -  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुरुवारी सकाळी हातात कुदळ घेऊन परळी तालुक्यातील रेवलीसह मलनाथपूर,परचुंडी  गावात श्रमदान केले. आपला नेताच श्रमदानासाठी पुढे सरसावला असल्याचे पाहून ग्रामस्थांचा आनंदही द्विगुणित झाला व बघता बघता सर्व गाव श्रमदानासाठी जमा झाले.  


पाणी फाउंडेशनच्या वॉटरकप स्पर्धेत परळी तालुक्यातील रेवली गावाने यंदा  सहभाग घेतला असून काही दिवसांपासून  सकाळच्या वेळी ग्रामस्थ श्रमदान करीत आहेत. गुरुवारी सकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे रेवली गावात पोहोचले. या वेळी त्यांनी हातात कुदळ घेऊन खोदकामही केले. या वेळी त्यांनी डोक्यावर पाटी घेऊन मातीही टाकण्याचे काम केले.

बातम्या आणखी आहेत...