आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेपर अवघड गेल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या; अंबाजोगाई शहरातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर अवघड गेल्याने  निराश झालेल्या विद्यार्थ्याने घरातील फॅनच्या हुकला  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना अंबाजोगाई शहरातील नागझरी परिसरात  मंगळवारी उघडकीस आली.  समीर सतीश ठाकूर ( १८) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.


अंबाजोगाई येथील सी.बी. स्कूलमध्ये समीर ठाकूर  बारावीच्या वर्गात शिकत होता. सध्या बारावीची परीक्षा सुरू असून   त्याने इंग्रजी,भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, द्वितीय भाषा असे चार विषयाचे पेपर दिले होते. यात  २८ फेब्रुवारी २०१८ रोजी  त्याने रसायनशास्त्राचा पेपर  दिला. परंतु हा पेपर अवघड गेल्याने समीर अस्वस्थ होता. पेपर अवघड गेल्याचे त्याने  कुटुंबातील लोकांना सांगितले. तेव्हा  घरातील लोकांनी त्याची समजूत काढून  त्याला नैराश्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न केले. पंरतु तो या नैराश्यातून बाहेर आला नाही.  शेवटी मंगळवार, ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता घरात कोणीच नसताना छताच्या फॅनच्या हुकला गळफास लावून त्याने आत्महत्या केली. त्याच्या पार्थिवावर सायंकाळी ५ वाजता बोरूळ तलाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. नगर पालिकेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सतीश ठाकूर यांचा समीर हा लहान  मुलगा होता.

बातम्या आणखी आहेत...