आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोरीत मुख्याध्यापकाची गळफास घेऊन आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- जिंतूर तालुक्यातील बोरी येथे मुख्याध्यापकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  मंगळवारी (दि.१७) सकाळी आठ वाजता ही घटना घडली. जिंतूर तालुक्यातील करंजी येथील रहिवासी असलेले पंढरीनाथ गणपतराव घोगरे हे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक होते. मागील तीन वर्षांपूवी त्यांची बदली सेलू तालुक्यातील कान्हड येथील जिल्हा परिषद शाळेत झाली होती . मागील काही दिवसांपूर्वी त्यांच्या दुचाकीला अपघात झाल्याने त्यांच्या डोक्यास जबर मार होता .

मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा एका खोलीत झोपलेला होता. तर पत्नी दोन दिवस अगोदरच औंढा नागनाथला गेली होती.  पंढरीनाथ घोगरे हे सकाळीच लवकर उठून  फिरण्यासाठी (जॉगिंग) बाहेर गेले.  काही वेळाने परतले. नंतर त्यांनी छताच्या पाइपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी आठ वाजता त्यांचे मोठे जावई  आले. त्यांनी दरवाजा उघडण्यासाठी  आवाज दिला असता मुलाने दरवाजा उघडला. त्याचवेळी छताच्या पाइपला घोगरे यांचा मृतदेह लटकलेला दिसला. घटनेची माहिती  बोरी पोलिस ठाण्यास कळवण्यात आली.  पंचनामा व शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या परिवाराकडे देण्यात आला .  त्यांच्या गावी करंजीला  अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली व जावई असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...