आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तरपत्रिका जळीतप्रकरणी 14 कर्मचाऱ्यांचे निलंबन;गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- केज येथील गट साधन केंद्रातील दहावी व बारावीच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात सोमवारी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी  १४ कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. 


केज तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रांवरून घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या १४२० उत्तरपत्रिका गटसाधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. शनिवारी रात्री आठच्या दरम्यान या त्या आगीत खाक झाल्या होत्या. रविवारी सीईओ अमोल येडगे यांनी बीईओंसह एकूण १५ जणांना निलंबनाच्या नोटीस दिल्या होत्या. सोमवारी सकाळपासूनच या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू होती.  येडगे यांनी १४ जणांच्या निलंबनाचे आदेश काढले तर बीईओंच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान, राज्य शिक्षण मंडळानेही संबंधित प्रकरणाचा अहवाल मागवला अाहे. तसेच उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान हाेणार नसल्याची ग्वाही देतानाच या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षाही घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले अाहे.

बातम्या आणखी आहेत...