आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतबाधा झाल्याचे सांगून विवाहितेच्या डोक्यावर लिंबू कापून अघोरी उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांकेतिक फोटो... - Divya Marathi
सांकेतिक फोटो...

नांदेड- विवाहित महिलेस भूतबाधा झाली आहे, असे सांगून तिच्या डोक्यावर लिंबू कापून उपचार करणाऱ्या तसेच तिला जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या पती व भोंदू बाबासह चार जणांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


स्नेहनगर शासकीय वसाहत येथील विवाहित महिला आलिया तबस्सूम नियाज अहमद खान (२६) हिचा औरंगाबाद येथील नियाज अहमदखान तुराबखान यांच्यासमवेत विवाह झाला होता. मागील काही दिवसांपासून आलिया तबस्सूम हिची प्रकृती ठीक नव्हती. तुला भूतबाधा झाली असल्याचे सांगून पती नियाज अहमदखान, सासरे तुराबखान अहमदखान व  सासू यांनी मांत्रिक बिलालबाबा यास बोलावून घेतले. त्यानंतर ते सर्व जण २१ जानेवारी रोजी नांदेडला आले. त्यांनी आलिया तबस्सूम हिला भूतबाधा झाल्याने सांगून तिच्या डोक्यावर लिंबू कापले. तसेच आलिया हीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. 


याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलिस ठाण्यात पती नियाज अहमदखान, मांत्रिक बिलालबाबा व सासू, सासरे या चार जणांवर भाग्यनगर पोलिस ठाण्यात जादूटोणा कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...