आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशासाठी पोटच्‍या मुलानेच जिंवत आईला दाखवले मृत; जमीनीवरही मारला डल्‍ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- केवळ पैशासाठी पोटच्या मुलाने जन्मदात्या वृद्ध आईला मृत दाखवले.  एवढेच नव्हे तर वडिलांच्या अपघाती  मृत्यूनंतर आईला सांभाळण्याएेवजी वारसा हक्काने  तिच्या नावावर पाच एकर २४ गुंठे जमीन न करता स्वत:च्या नावावर केली. धुळे-सोलापूर या  राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात  संपादीत झालेल्या अडीच गुंठे जमिनीचा २८ लाख रुपयांचा  आलेला मावेजा  आई व बहिणीला न देता तो गिळल्याचा प्रकार बीड तालुक्यातील पाली गावात उघडकीस आला आहे. नात्यावरच्या विश्वासाला अशा प्रकारे तडा गेला असून ६५ वर्षांच्या वृद्ध आईने मुलगी व जावायाच्या मदतीने बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात मुलाच्या विरूद्ध तक्रार दिली आहे.  


बीड तालुक्यातील पाली येथील रहीवासी येथील रूक्मिनबाई धनवडे यांचे पती आश्रुबा यांचे ७ जून २०१७ रोजी पाथरी तालुक्यात अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या नावे पाली  शिवारात पाच एकर २४ गुंठे  शेतमजमीन आहे. आश्रुबा धनवडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर सदरील शेतजमीन त्यांची पत्नी रूक्मिणबाई यांच्या नावावर वारसा हक्काने होणे गरजचे असताना मुलगा सर्जेराव धनवडे याने आईचा मृत्यू ५ जानेवारी २०१६ रोजी झाला असल्याची खोटी माहिती ग्रामपंचायतीला दिली. यावरून ३० जानेवारी २०१६ रोजी तत्कालीन ग्रामसवेक वीर यांनी  कुठलीही खातरजमा न  करता नोंद करून सर्जेरावच्या हाती जिवंत असलेल्या रूक्मिणबाईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र टकवले. त्यांनतर याच प्रमाणपत्राच्या आधारे सर्जेराव याने तत्कालीन गाव तलाठ्याची दिशाभूल करत फेरफारला नोंद केली.  


कसा प्रकार उघडकीस आला ?  
सर्जेराव धनवडे याचे भाऊजी रामभाऊ राजाराम सवासे (रा. मोरेवाडी,ता.वडवणी )हे सर्जेरावकडील उसने घेतलले  पाच हजार रुपये मागण्यासाठी  पंधरा दिवसापूर्वी पाली येथे त्याच्या घरी आले. तेव्हा सर्जेराव ग्रामपंचायतीत गेला असल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. रामभाऊ ग्रामपंचायतीत गेले तेव्हा ग्रामसेवक बडे हे सर्जेरावकडे तुम्हाला आई आहे का ? बहिण कोठे आहे याची  चौकशी करत होते. तेव्हा सर्जेरावने माझ्या आईचा मृत्यू झालेला असे खोटे सांगून बहिण आहे की नाही याचीही माहिती ग्रामसेवकाला दिलीच नाही. हे पाहून ग्रामपंचायतीत आलेले राजाभाऊ यांना धक्काच बसला. त्यांनी काही वेळताच ग्रामवसेवक बडे यांना भेटून सर्जेरावला आई व बहिण असून तुम्ही सर्जेरावला आई मयत असल्याचे प्रमाणपत्र देवू नका असे बजावले होते. परंतु ते प्रमाणपत्र सर्जेरावच्या हाती पडले. शेवटी जावई असलेल्या राजभाऊ यांनी तलाठ्याला भेटून हा प्रकार सांगत सातबारा, मयताचे प्रमाणपत्र, सासऱ्याचे मयताचे प्रमाणपत्र हे कागदपत्र जमा केले.


दरम्यान,  वारसा हक्काच्या जमीनीचा २८ लाख रुपयांचा मावेजा सर्जेरावला मिळाला. परंतु याची माहिती सर्जेरावने दडवून ठेवत आई व बहिणीला कळूच दिली नव्हती.


आईचा सांभाळ करत नाही  
तो आईचा  सांभाळ  करत नाही सध्या आईचा सांभाळ आम्हीच करत आहोत. घडलेला प्रकार उघडकीस आल्याने भाऊ  माझ्याकडून चूक झाली  असे सांगत आहे. त्याने बँकेतून पैसे काढले असून तो  आईला मारहाण करतो बहिणीला चोळी बांगडी करत नाही. त्यामुळे  आम्हाला आता शेती वाटून दिली पाहिजे.  
- लक्ष्मीबाई सवासे, सर्जेरावची बहीण


फसवणुकीचा गुन्हा नोंदवू 
आईचा मृत्यू झाला आहे असे खोटे शपथपत्र मुलाने ग्रामपंचायतीला दिले असून त्या आधारे आम्ही नोंद केली. त्याची गावात आई राहत नव्हती. त्यावेळी आम्ही गावात खातरजमा करायला पाहिजे होती ती केली नाही.या प्रकरणात आम्ही मुलाच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवणार आहोत. 
- श्रीराम वीर, तत्कालीन ग्रामसेवक, पाली

बातम्या आणखी आहेत...