आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टक्केवारीविना फाइल पुढे सरकत नाही, नितीन गडकरी यांची खंत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा - राज्यात लाखो रुपयांची कामे सुरू असताना काही कामे करण्यासाठी ठेकेदार मिळत नाहीत. या ठेकेदारांची आपण नागपूर येथे एक बैठक घेणार आहोत. आपल्या प्रकल्पातील अशी काही कामे येत्या एक वर्षात पूर्ण करण्यात येतील. यात महाराष्ट्रातील कामांचा समावेश आहे. परंतु, असे काही प्रकल्प आहेत त्यांची कामे टक्केवारी दिल्याशिवाय होत नाहीत, अशी खंत केंद्रीय भूपृष्ठ व जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केेली. या प्रकाराला लगाम लावण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.


भारतीय जैन संघाच्या वतीने दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या उद््घाटनानिमित्त गडकरी  बुलडाणा येथे आले होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गडकरी म्हणाले, तीन हजार कोटी रुपये गंगा जलशुद्धीकरणासाठी जमा केले आहेत. रस्त्याच्या कामांमुळे जेसीबीची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीनेही आता या कामात मदत करणे आवश्यक आहे. पाच लाख कोटींची कामे महाराष्ट्रात होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...