आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटबंधारे विभागाच्या खोलीला आग; दस्तऐवज खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - येथील जायकवाडी वसाहतीतील पाटबंधारे विभागाच्या परिसरातील मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोन या कार्यालयास मंगळवारी (दि.२९) पहाटे तीनच्या सुमारास लागलेल्या आगीत कार्यालयातील तीन खोल्यांतील महत्त्वपूर्ण कागदपत्रे जळून खाक झाली.  
महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या एका बंबाने रात्री तीनच्या सुमारास दोन राऊंडद्वारे दोन तासानंतर ही आग आटोक्यात आणली.

 

मात्र, तिन्ही खोल्यांतील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली होती. यात कार्यालयाच्या खिडक्या, लाकडी कपाटे, दरवाजे पूर्णपणे भस्मसात झाली.  जायकवाडी परिसरात मांजरा प्रकल्प उपविभाग क्रमांक दोनच्या( भूसंपादन) कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय आहे. लोअर दुधना प्रकल्पांतर्गत या कार्यालयाचे कामकाज चालते. मंगळवारी(दि.२९) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास या कार्यालयातून धुराचे लोट बाहेर आल्याने कार्यालयाला आग लागल्याचे परिसरातील एका व्यक्तीस दिसून आले. त्याने तातडीने पोलिसांना व अग्निशमन दलाला याची माहिती दिल्यानंतर रात्री तीनच्या सुमारास अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यालयाच्या तिन्ही खोल्यांमध्ये कागदपत्रे असल्याने असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.  दहा हजार लिटर पाण्याचा मारा केल्यानंतर दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. या आगीत सुमारे ५५० दस्तावेज जळून खाक झाल्याने सूत्रांनी सांगितले. 

 


घटना संशयास्पद : कागदपत्रांमध्ये सातबारा, संचिका, भूमिअभिलेख प्रस्ताव, संयुक्त मोजणीच्या फाइल आदी कागदपत्रांचा समावेश आहे.  मात्र दस्तऐवज असलेल्या खोल्यांनाच ही आग लागल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दोन दिवसांपूर्वी ७६ शेतकऱ्यांनी निम्न दुधना प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मोबदला मिळण्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. पार्श्वभूमीवर कार्यालयाच्या दस्तऐवज खोल्यांनाच लागलेली आग संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...