आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण होताच हुंड्यात वकिलाने मागितले पंधरा लाख रुपये, वीस तोळे सोन्याचे दागिने!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण होताच हुंड्यात  १५ लाख रुपये द्या अन्यथा लग्न मोडा, अशी धमकी देणाऱ्या वकील नवरदेवासह त्याच्या भावाविरुद्ध  वसंत पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.  


वसंत येथील शेख साबेर शेख इब्राहिम (रा.दर्गाह मोहल्ला) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलीचा साखरपुडा रेल्वे विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी शेख खाज मोईनुद्दीन (रा.मुस्काट फंक्शन हॉलच्या पाठीमागे, वसंत) यांचा मुलगा अॅड. शेख फैयाजुद्दीन यांच्यासोबत २१ सप्टेबर २०१७ रोजी मोठ्या थाटात संपन्न झाला होता. नवरदेव वकील असल्याने या कार्यक्रमासाठी  शेख साबेर यांनी सुमारे ३ लाख रुपये खर्च केले. 


दरम्यानच्या काळात अॅड. शेख फैयाजुद्दीन न्यायाधीशपदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन त्याची अंतिम निवडही झाली. त्यानंतर मात्र अॅड. शेख  आणि त्याच्या भावाने ठरलेले लग्न करण्यास असहमती दर्शवत मुलीच्या वडिलांना हे लग्न करायचेच असेल तर १५ लाख रुपये रोख, एक इनोव्हा कार आणि २० तोळे सोन्याचे दागिने असा हुंडा द्यावा लागेल, अशी अट घातली.   १० मार्च २०१८ रोजी वधू पिता  शेख साबेर शेख इब्राहिम  यांनी अॅड. शेख फैयाजुद्दीन यांची भेट घेऊन लग्नाबाबत विचारणा केली असता तो गुंड्याच्या रकमेसह कार आणि सोन्याचे दागिने दिल्याशिवाय  लग्न होणार नाही.  मी आता न्यायाधीश झालो आहे. गुन्हा दाखल झाला तरी मी हायकोर्टात जाऊन एफआयआर रद्द करून आणतो, अशी धमकी दिली. अॅड. शेख याचा  भाऊ शेख गयासोद्दीन हा त्याला मदत करती होता. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेख साबेर शेख इब्राहिम यांनी रविवारी रात्री १२ च्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरून अॅड. शेख फैयाजुद्दीन व त्याचा भाऊ शेख गयासोद्दीन यांच्याविरुद्ध वसंत शहर पोलिस ठाण्यात हुंडा प्रतिबंधक कायद्यास  भांदविच्या विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीशपदी नियुक्ती मिळण्यापूर्वीची गजाआड होण्याची वेळ भावी न्यायाधीशांवर आली असून त्याचा भाऊही  अडचणीत आला आहे.

 

या गुन्ह्यांत अशी आहे शिक्षेची तरतूद
भादंविच्या कलम ४०६ नुसार तीन वर्षे शिक्षा किंवा दंड किंवा शिक्षा आणि दंड दोन्ही. कलम ५०६ नुसार एक किंवा दोन वर्षे शिक्षा किंवा आर्थिक दंड. किंवा  शिक्षा आणि दंड अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तर हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या कलम ४ नुसार सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शिक्षा आणि दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. 

 

तक्रारीनंतर वकील महाशयांवर पोलिसांनी लावली ही कलमे
वधू पित्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अॅड. शेख फैयाजुद्दीन  याच्याविरुद्ध भादंविच्या कलम ४०६ (विश्वासघात), ५०६ (धमकावणे)   ३४ (संगनमत) आणि हुंडा प्रतिबंधक अधिनयम ४ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक उदयसिंग चंदेल यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...