आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री गोपीनाथ गडावर येणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतिदिनानिमित्त ३ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्यासह अनेक मंत्री, खासदार, आमदार गोपीनाथ गडावर उपस्थितीत राहणार असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. 


लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या वर्षीही विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकरी तसेच महिला बचत गटांना साहाय्य यानिमित्ताने दिले जाते. ३ जूनला दुपारी १२ वा. गोपीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार उदयनराजे भोसले यांची उपस्थितीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी १० वा. रामराव महाराज ढोक यांचे कीर्तन होईल. 

 

 

बातम्या आणखी आहेत...