आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराई: अंगणवाडी केंद्रात केली कार्यकर्तीने आत्महत्या; ६ महिन्यापासून मिळत नव्हते मानधन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - सहा महिन्यांपासून मानधन मिळत नसल्याने हताश झालेल्या अंगणवाडी  कार्यकर्तीने अंगणवाडी केंद्रातील लोखंडी अँगलला  ओढणीने  गळफास घेत शनिवारी दुपारी आत्महत्या केली. नीता भागवत शिंदे असे आत्महत्या केेलेल्या कार्यकर्तीचे नाव आहे. अंगणवाडी केंद्रातच नैराश्यातून झालेल्या या आत्महत्येमुळे स्थानिक प्रशासन हादरले आहे. 


गुंतेगाव येथील अंगणवाडी केंद्र क्र. १ येथे अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून नीता भागवत शिंदे  ही महिला कार्यरत होती. पतीच्या निधनानंतर या महिलेला अंगणवाडी कार्यकर्ती म्हणून मिळणारे मानधन हे उदरनिर्वाहाचे साधन होते. मूलबाळ नसल्याने ती वयोवृद्ध वडील  भागवत शिंदे यांच्याकडे राहत होती.

 

अद्याप तक्रार नाही

या प्रकरणी अजून आमच्याकडे तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतर तपास करून चौकशीअंती कारवाई करण्यात येईल. त्यानंतरच आत्महत्तेचे नेमके कारण स्पष्ट होईल.
- विजयकुमार जोगदंड, पोलिस उपनिरीक्षक, उमापूर पोलिस चौकी

 

बातम्या आणखी आहेत...