आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटच्या मुलींवर बलात्कार;नराधम बापास 10 वर्षे सक्तमजुरी,आष्टी तालुक्यातील प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- पोटच्याच दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा २ महिने लैंगिक छळ करणाऱ्या नराधम बापास बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने १० वर्षांची सक्तमजुरी सुनावली.  


आष्टी तालुक्यातील कडा येथे जन्मदात्यानेच आपल्या १२ व १७ वर्षांच्या दोन मुलींवर बलात्कार करून दोन महिने त्यांचा लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात आष्टी पोलिसांत ३० डिसेंबर २०१४ रोजी बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी या प्रकरणी तपास करून दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले होते. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी झाली.जिल्हा सरकारी वकील अजय राख यांनी या प्रकरणात बाजू मांडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये तक्रारदार, पीडित मुली, तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व इतरांचा समावेश होता.  गुरुवारी न्या. बी. व्ही. वाघ यांनी त्या नराधम बापास दोषी ठरवून दहा वर्षांची सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास सहा महिन्यांची सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली. अजय राख  यांना सहायक सरकारी वकील मंजूषा दराडे,  नामदेव साबळे यांनी सहकार्य केले.

 

भावनिक दृष्ट्या अवघड तपास
पोटच्याच मुलींवर अत्याचार करणाऱ्या बापाविरोधातल्या या गुन्ह्याचा तपास भावनिकदृष्ट्या अवघड होता. मुलींचे जबाब,आईचा जबाब व इतर पुरावे चांगल्या पद्धतीने गोळा करून दोषारोपपत्र दाखल केल्याने आरोपी शिक्षेपर्यंत पोहोचू शकला.
- दिनेश आहेर, पोलिस  निरीक्षक

बातम्या आणखी आहेत...