आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीत वैद्यनाथाच्या सुरक्षेसाठी 100 सीसीटीव्ही; शंभर रुपयांत दर्शन पासची व्यवस्था

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथाच्या महाशिवरात्री यात्रा महोत्सवास मंगळवारी प्रारंभ होत आहे. यंदा यात्रा महोत्सवाच्या काळात वैद्यनाथ मंदिरात परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून शंभर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले.  २५० पोलिस तैनात केले जाणार असून भाविकांना शंभर रुपयांच्या दर्शन पासची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना सहज दर्शन घेता यावे यासाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा लावण्यात येणार आहेत.  


बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग  असलेल्या परळी येथील वैद्यनाथाच्या महाशिवरात्र यात्रा महोत्सवास १३ फेब्रुवारीपासून सुरुवात होत  आहे.  परळी नगरपालिकेच्या वतीने यात्रा नगरी व कुस्ती स्पर्धेची तयारी सुरू असून गुरुवारपासून शिवकथाही सुरू झाली आहे. वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने वैद्यनाथ मंदिरात भाविकांना वैद्यनाथाचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी महिला व पुरुषाच्या दोन  स्वतंत्र रांगा लावण्यात येणार असून मंदिराच्या पायऱ्यावर  नागमोडी बॅरिकेड्स  लावण्यात येणार असून  मंडप उभारणीचे काम सुरू  असून मंदिरात रंगरंगोटी व विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. मंदिर परिसरात यंदा कडेकोट पोलिस बंदोबस्त राहणार असून दोन पोलिस उपअधीक्षक, २२ पोलिस अधिकारी, २४० पोलिस, ५० महिला पोलिस, दोन दंगल नियंत्रण पथके,  राज्य राखीव दलाची एक तुकडी, ७० होमगार्ड पुरुष, ३० महिला होमगार्ड असा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मंदिर,भाविक यांच्या सुरक्षेसाठी पोलिस दलाच्या वतीने, मंदिर  संस्थान यांच्याद्वारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे निगराणीसाठी लावण्यात आले आहेत.

 

दोन दिवसांत होणार तपासणी 

 वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव भरत असतो. मंदिर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस दलाकडून दोन दिवस दंगल नियंत्रण पथक, श्वानपथक, बॉम्बशोधक-नाशक पथक सह अन्य तपासण्या केल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...