आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांड्यावरील मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकानेच घेतले बंजारा भाषेचे धडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - एका डोंगरावर शाळा, जाण्यासाठी धड रस्ता नाही. दिवाळी संपली की शाळेत केवळ १० ते १२ मुले असे चित्र असलेल्या शाळेत शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या एका अवलीयाने शाळेचा कायापालट करण्याच्या निश्चय केला. बंजारा समाजाच्या तांड्यावर शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्याने  बंजारा भाषा शिकून घेत   पालकांच्या भेटी, सभा घेत मुलांचे १०० टक्के स्थलांतर थांबवले. आज हाच शिक्षक राज्यातील शाळांना गुणवत्ता वाढीसाठी धडे देत आहे. 

मंठा शहरापासून २० कि.मी.वरील  श्रीराम तांडा येथील लोकसंख्याही बोटावर मोजण्याइतकी आहे. येथे  जिल्हा परिषदेची  पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे.  ८० टक्के गावकरी  कामानिमित्त दिवाळीनंतर इतरत्र स्थलांतरित होतात.   दिवाळीनंतर शाळा रिकामी होते.  मात्र, २००४ मध्ये नियुक्त झालेले शिक्षक जगदीश कुडे यांनी या परिस्थितीवर मात करण्याचे नियोजन केले.

 

 खडकावर बांधलेल्या शाळा परिसरात एकही झाड नव्हते. तेथे कुडे यांनी उन्हाळ्यातही टिकतील अशी झाडे लावली.  त्यांनी पालकांची भेट घेतल्यानंतर त्यांना अाम्हीही याच शाळेत शिक्षण घेतले.  पण हाती कोयताच आल्याचे उत्तर मिळाले. सुरुववातीला कोणीही प्रतिसाद देत नव्हता. तरीही पालकांच्या बैठका घेणे, महिलांच्या कार्यशाळा घेत त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. 
विद्यार्थ्यांकडूनच  शिकली भाषा: पालकांशी संवाद साधताना  भाषेचा अडसर येत होता. त्यामुळे कुडे यांनी शाळेतील बंजारा विद्यार्थ्यांकडूनच त्यांची बोलीभाषाही शिकून घेतली. नंतर  या भाषेवर प्रभुत्व मिळवल्यानंतर त्यांनी  तीनच वर्षांत विद्यार्थ्यांची गळती १०० टक्के थांबवली. 

 

मंठा तालुक्यातील  अव्वल शाळा
श्रीराम तांड्यावरील शाळा गुणवत्तेच्या बाबतीत मंठा तालुक्यात अव्वल आहे. एकूण १०२ विद्यार्थ्यांपैकी या शाळेत तांड्यावरील ३० मुले आहेत.  ७२ विद्यार्थी  परिसरातील गावांतून जवळपास २० ते २५ किमी अंतरावरून  शाळेत  येतात. त्यांना सहकारी शिक्षक एन.जी.पठाण, ऋषिकेश कुटे यांचे  सहकार्य आहे.  कुडे यांच्या कार्याची दखल घेत राज्यातील पहिले बालरक्षक म्हणूनही त्यांची निवडही करण्यात आली आहे. त्यांचा नुकताच शिक्षण सचिव नंदकुमार यांनी सत्कारही केला आहे.  त्यांना राज्याचा तसेच जिल्ह्याचा आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे.  

 

मुलींच्या शिक्षणाचे प्रमाणही वाढवले 
२००८ पासून ज्या मुली  सातवीत उत्तीर्ण होतील त्या मुलींच्या पालकांचा शाळेच्या वतीने विशेष सत्कार करण्याची संकल्पना राबवण्याला सुरुवात करण्यात आली. याला प्रतिसाद मिळाल्यानंतर आजपर्यंत मुलींनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. यासाठी त्यांनी महिला, पालकांचे मेळावे घेऊन त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.  

 

पुढील स्‍लाइडवर पाह, शिक्षकांची प्रतिक्रिया...

बातम्या आणखी आहेत...