आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत आग; 4 दुकाने, 22 दुचाकी जळून खाक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- येथील जिंतूर रस्त्यावरील तलरेजा चित्र मंदिरासमोर सोमवारी (दि.१९) पहाटेच्या दरम्यान  लागलेल्या आगीत चार दुकानांसह जुन्या २२ मोटारसायकली जळून खाक झाल्याची घटना घडली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 


शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तलरेजा  चित्रपट गृहासमोर फर्निचर, अॉटो कन्सल्टन्सी, आॅटो गॅरेज आणि शीतपेय विक्री केंद्र अशी चार दुकाने आहेत. सोमवारी पहाटेच्या सुमारास या दुकानांना अचानक आग लागल्याचे लक्षात आले . फर्निचरच्या दुकानाला सुरुवातीस आग लागल्याचे सांगण्यात आले . विविध लाकडी साहित्य तयार करणाऱ्या दुकानाला लागलेली आग भडकत गेली आणि बावीस गाड्यांसह दुकाने जळाली. गेल्या काही महिन्यांपासून ही दुकाने भाड्याने घेण्यात आली होती. या आगीत एक कार आणि गॅरेजमधील साहित्यही  जळाले . बावीस मोटारसायकलींमध्ये विविध कंपन्यांच्या गाड्यांचा समावेश आहे. यासंदर्भात कोतवाली पोलिस ठाण्यात सायंकाळपर्यंत गुन्ह्याची नोंद झाली नव्हती. आगीचे कारण समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...