आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसमधून 5 हजारांची चोरी, पकडल्यावर चारही महिलांनी दिले सर्व पैसे परत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारज- वेळ सकाळी साडेआठची. औरंगाबादहून नाशिक एशियाड गाडी निघाली. गाडी साडेनऊदरम्यान देवगाव फाट्यावर येताच त्यातून चार महिला लहान मुलांसह उतरल्या. तेथून त्या खासगी वाहनाने गारज मनूर फाटा येथे उतरल्या. तेव्हा एकाने त्यांना ओळखत सुमारे शंभर- दोनशे लोकांच्या जमावाने त्या महिलांना घेरले अन् पाहता पाहता पंधरा मिनिटांत तेथे देवगाव पोलिसांची गाडी व एसटी आली. त्यातून एका महिलेने उतरत या चारही महिलांना पाहताच म्हणाली, याच आहेत ज्यांनी माझ्या पर्समधून पाच हजार चोरले व फाट्यावर उतरल्या. तेव्हा जमावाला परिस्थिती काय आहे ते कळले. तोपर्यंत येथे मोठा जमाव जमला होता. हे घ्या पैसे, आम्हाला सोडून द्या अशी विनवणी या महिला करत होत्या. त्यांनी पैसे परत केले. कुणी फिर्यादी नसल्याने पोलिसांनी त्या महिलांना सोडून दिले. 


फिर्याद नसल्यामुळे या महिलांना सोडून देण्यात आले व आरोपी महिला   असल्याने त्यांची नावेही सांगता येणार नाहीत, असे देवगाव रंगारीच्या सहायक पोलिस निरीक्षक शहापूरकर यांनी सांगितले. 


अशी आहे घटना

औरंगाबाद- नाशिक एशियाड क्र. एमएच.०६ एस. ८८९८ बसमध्ये चोरी करून पळ काढत आलेल्या चार महिलांना शनिवारी सकाळी गारज येथे ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. परंतु फिर्यादी नसल्याने  देवगाव रंगारी ठाण्यात त्यांच्याविरुद्ध कुठल्याही  प्रकारचा गुन्हा दाखल न करताच त्यांना सोडून देण्यात आले. काही दिवसांत बसप्रवासात मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता असतानाच या सर्वच महिला चोरांचा सोडून देण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

बातम्या आणखी आहेत...