आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळमध्ये सीपीएन आणि सीपीएन माआेवादी पक्षात युती; आेली- प्रचंड दोघेही 5 वर्षांत भूषवणार पंतप्रधानपद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काठमांडू- नेपाळमध्ये सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन-माआेवादी पक्षात युती झाली असून त्यांनी सरकार स्थापनेचा निर्णय घोषित केला. सीपीएन-यूएमएल युतीचे नेतृत्व पंतप्रधान के.पी. शर्मा आेली यांच्याकडे असून सीपीएन-माआेवादी गटाचे नेतृत्व माजी पंतप्रधान प्रचंड यांच्याकडे आहे. या दोन्ही पक्षांनी डिसेंबर २०१७ मध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत २७५ जागांपैकी १७४ जागांवर विजय मिळवला होता. सोमवारी या दोन्ही डाव्या पक्षांची बैठक झाली. बैठकीत युतीचा निर्णय घोषित करण्यात आला. या युतीसाठी महत्त्वाच्या ७ अटींवर सहमती झाली आहे.  


कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ नावावर एकमत
सीपीएन-यूएमएल आणि सीपीएन-माआेवादी पक्षाच्या युतीनंतर निर्माण झालेल्या पक्षाचे नाव कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ असे निश्चित करण्यात आले आहे. माआेइस्ट सेंटर पक्ष या युतीत सामील होईल, असे समन्वयक समितीचे सदस्य नारायण काजी श्रेष्ठा यांनी म्हटले आहे. आगामी कॅबिनेटमध्ये पदांच्या वाटपासाठी दोन्ही पक्षात लवकरच बैठक होणार आहे.  मंत्रीपदाचे वाटप या बैठकित केले जाईल असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. 


आेली आणि प्रचंड यांना समान शक्ती  
या करारानुसार आेली आणि प्रचंड यांना समान शक्ती देण्यात आली आहे. पाच वर्षांचा पंतप्रधान पदाचा कार्यकाळ देखील दोघांमध्ये समान विभागला जाणार आहे. मार्क्सवादी आणि लेनिनवादी पक्ष प्रथमच सत्तेत भागीदार झाले आहेत. बहुपक्षीय लोकशाहीचा पुरस्कार करण्याचे धोरण उभय नेत्यांनी स्वीकारले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोन्ही पक्षांनी निवडणुकीपूर्वी आचानक युती करणार असल्याचे जाहीर केले होते. 

बातम्या आणखी आहेत...