आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमीरखानची बीड जिल्हाधिकाऱ्यांशी साडेतीन तास चर्चा; वॉटर कप स्पर्धेत बीडची सर्वाधीक गावे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- यंदाच्या वॉटर कप स्पर्धेत मराठवाड्यात सर्वात जास्त म्हणजे ५८६ गावे बीड जिल्ह्यातील असून सोमवारी मुंबईत झालेल्या पाणी फाऊंडेशनच्या बैठकीस चित्रपट अभिनेता अमिर खान याने बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना निमंत्रण दिले. जिल्हाधिकाऱ्यांशी अमीरने तब्बल साडेतीन तास चर्चा केली. वॉटर कप स्पर्धेत यंदा बीड जिल्हा राज्यात पहिला येईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून एप्रिल महिन्यात श्रमदानासाठी अमिर खान बीड जिल्ह्यात येणार आहे. 


मागील तीन वर्षापासून बीड जिल्हा पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी होत असून गावे पाणीदार होत आहेत. यंदा जिल्ह्यातील केज ,अंबाजोगाई, धारूर परळी ,आष्टी या पाच तालुक्यातील ५८६ गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाली असून सध्या ५४० गावांनी दोन फाॅर्म भरले आहेत. यंदा या स्पर्धेत मराठवाड्यात सर्वात जास्त गावे बीड जिल्ह्यातून सहभागी झाली आहेत. 


१९ फेब्रुवारी २०१८ रोजी मुंबईत झालेल्या फांऊडेशनच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांना अमीर खान यांनी निमंत्रण दिले होते. सोमवारी रात्री साठ ते साडेअकरापर्यंत जवळपास साडेतीन तास जिल्हाधिकारी सिंह, अविनाश पौळ, सत्यतीत भटकळ व अमिरखान यांची चर्चा झाली. जिल्ह्यात येत्या ८ एप्रील २०१८ ते २२ मे २९१८ दरम्यान सलग ४५ दिवस वॉटर कप स्पर्धेस सुरूवात होत आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५,५० व ४० लाखाचे पारितोषीक दिले जाणार आहे. या स्पर्धेत तालुक्यात नंबर वन असलेल्या गावांना प्रत्येकी दहा लाख रूपयांचे बक्षीस मिळणार आहे. यंदा जिल्ह्यातील सर्वाधीक गावे असल्याने राज्यात बीड जिल्हा कसा पहिला येईल या दृष्टीने जिल्हाधिकारी सिंह यांनी तयारी सुरू केली आहे. अमिर खान यांच्याशी चर्चा करतांना बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे पाणीदार होतील असा विश्वास दिला.


२८ रोजी कोळपिंपरीत श्रमदान 
परळी तालुक्यातील कोळपिंपरी येथे येत्या २८ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या उपस्थीतीत श्रमदान होणार आहे. त्यांनतर एप्रील महिन्यात स्वत:अमिर खान बीड जिल्ह्यात येणार आहे. त्यामुळे यंदा बीड जिल्हा राज्यात कसा पहिला येईल या दृष्टीने जिल्हा प्रशासनानेही जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना सुचना दिल्या असून नरेगाची कामे प्राध्यान्याने करण्याच्या कडक सुचना दिल्या आहेत. 


अकोल्यातील भेटीमुळे मैत्री वाढली 
जिल्हाधिकारी एम.डी.सिंह अकोल्यात मुख्य कार्यकारी अधिकारी असतांना त्यांची आमिर खान यांच्याशी ओळख झाली. पुढे खान बरोबर सिंह यांची मैत्री वाढत गेली. मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील सर्वाधीक गावे यंदा वॉटर कप स्पर्धेत असल्याने आमीर खानने जिल्हाधिकारी सिंह यांना मुंबईच्या बैठकीचे निमंत्रण देउन वॉटर कप स्पर्धा यशस्वी करण्याबाबत त्यांच्याशी थेट चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...