आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल येडगे बीड जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- जिल्हा परिषदेला अखेर काही महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पूर्णवेळ मुख्य कार्यकारी अधिकारी मिळाले आहेत. नाशिक येथील सहायक जिल्हाधिकारी तथा आयटीडीपीचे प्रकल्प संचालक अमोल येडगे यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त असलेल्या बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांच्याकडे देण्यात आला होता. शनिवारी शासनाने आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यामध्ये अमोल येडगे यांची नाशिकहून बीडमध्ये बदली करण्यात आली. अमोल येडगे हे 2014 च्या आयएएस बॅचचे अधिकारी असून जळगावमध्ये त्यांनी प्रशिक्षण कालावधी पूर्ण केला. त्यानंतर कळमनुरी (जि. हिंगोली) येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली नाशिक येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली. सध्या ते नाशिकचे सहायक जिल्हाधिकारी तथा आयटीडीपीचे प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत आहेत. नाशिकच्या उपविभागीय अधिकारीपदाचा पदभारही त्यांच्याकडे आहे. 

 


वरिष्ठांशी चर्चा करुन रुजू होणार
सध्या माझ्याकडे नाशिक एसडीएम, आयटीडीपी प्रकल्प संचालक असे महत्वाचे पदभार असल्याने सहायक आयुक्त व वरिष्ठांशी चर्चा करुन येथील पदभार सोडून बीडमध्ये रुजू होईल. लवकर रुजू होण्याचा प्रयत्न असेल असे येडगे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले

बातम्या आणखी आहेत...