आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सातवर्षीय बालिकेचे अपहरण करून अत्याचार; आरोपी अटकेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहराच्या मध्यवर्ती भागातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे . बबलू सय्यद अश्रफ ( ३५) असे त्याचे नाव आहे.


पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी  दुपारी एक दांपत्य आपल्या सात वर्षाच्या मुलीसह नातेवाइकांच्या लग्नाकरिता वस्तू खरेदीसाठी जनता मार्केटला आले होते.  तेथे त्यांना बबलू सय्यद अश्रम भेटला.  हे दांपत्य खरेदी करीत एम्पोरियम गांधी पार्क परभणी येथे गेल्यानंतर बबलूने तुमच्या मुलीसोबत मी बाहेरच थांबतो असे म्हणाला. तो बाहेरच थांबला आणि मुलीसह पसार झाला.   खरेदी आटोपून दांपत्य बाहेर आले असता त्यांना मुलगी आणि बबलू  दिसले नाही. त्यांनी शोध घेतला. शेवटी आपल्या मुलीला बबलूने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याची खबर नानलपेठ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. पोलिसांनी शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा पूर्णा तालुक्यातील एका आखाड्याच्या परिसरात त्या मुलीला सोडून पळाल्याचे निष्पन्न झाले. 

 


याप्रकरणी पीडित मुलीस पळवून नेणारा आरोपी बबलू आश्रफ याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. 


पोलिस अधीक्षक  दिलीप झळके, पोलिस निरीक्षक संजय हिबारे , पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर, पोलिस उपनिरीक्षक आफळे,  हनुमंत जॅक्केवाड, किशोर चव्हाण अरुण कांबळे यांनी ही कारवाई केली. पोलिस उपनिरीक्षक चिंचोलकर अधिक तपस करीत आहेत. 

 

शेतकऱ्यांनी केली मदत
अाखाड्यावरील शेतकऱ्यांनी या मुलीचे नाव गाव विचारले. ती काहीच सांगू शकत नसल्याने त्यांनी तिला पूर्णा पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनी सदर पीडित मुलीला पूर्णा येथून नानलपेठ पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर   बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. 

बातम्या आणखी आहेत...