आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून विवाहित तरुणाकडून अत्याचार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई- विवाहित असतानाही एका तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी माजलगाव तालुक्यातील नाकलगाव येथील तरुणावर अंबाजोगाई पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ॲट्राॅसिटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.   


लातूर जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणी  पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी अंबाजोगाई येथे एका खासगी क्लासेसमध्ये  प्रशिक्षण घेत होती. या ठिकाणी तिच्यासोबत प्रशिक्षण घेणाऱ्या एका तरुणाला भेटण्यासाठी त्याचा मावसभाऊ राज ऊर्फ सिद्धेश्वर विटेकर येत असे. क्लासेसमध्येच राज व पीडितेची ओळख हाेऊन  याचे रूपांतर प्रेमात झाले.  


ओळखीचा फायदा घेत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. यानंतर पीडिता गर्भवती राहिली असता  तिचा गर्भपातही करण्यात आला.  दरम्यान, यानंतर त्रास होऊ लागल्याने तिला माजलगाव येथील खासगी रुग्णालयात नेऊन तिच्यावर उपचार केले.  तरुणीने राजच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मात्र राजचे लग्न २०१० सालीच झाल्याचे सांगून राजसोबत तिचे लग्न लावण्यास कुटुंबीयांनी नकार दिला.  पहिल्या पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्यासोबत लग्न करतो, असे आश्वासन देऊन तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. परंतु, नंतर राजची मानसिकता लक्षात आल्याने पीडितेने त्याच्यासोबत लग्न करण्यास स्वतःहून नकार दिला.  


दोघांचे अाक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी  करण्याची  धमकी राजने दिली. २८ डिसेंबर रोजी फोटो देण्याच्या बहाण्याने राजने  तरुणीला अंबाजोगाईला आणले व लग्न का करत नाहीस म्हणून तिला मारहाण करून पुन्हा लातूरला सोडले. तसेच तिच्या वडिलांनाही शिवीगाळ केली. 

बातम्या आणखी आहेत...