आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औंढा नागनाथ येथे महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा तांडा येथे, तू दिसायला चांगली नाहीस, स्वयंपाक येत नाही. त्यामुळे तुला आम्ही नांदवणार नाही, असे म्हणून एका महिलेला अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा दाखल केला .


कार्तिकी अमोल राठोड या महिलेने औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती अमोल राठोड सासरा सासू कांताबाई व इतर आरोपींनी तिला अंगावर रॉकेल टाकून जाळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या एक वर्षापासून सदरील आरोपी हे फिर्यादी महिलेस दिसायला चांगली नाही, तुला स्वयंपाक येत नाही, कोणत्याच कामाची नाही, असे म्हणत तिचा मानसिक छळ केला. तिचा पती  व तिच्या नातेवाइकांकडून तिला दररोज मारहाण सुद्धा करण्यात येत होती. रविवारी पहाटे चार वाजता आरोपींनी सदर महिला झोपेत असताना तिच्या अंगावर रॉकेल टाकले आणि तिला पेटवून दिले.  

बातम्या आणखी आहेत...