आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्हा औरंगाबाद विभागात पहिला, हिंगोली जिल्हा सर्वांत मागे; मुलींनीच मारली बाजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- दहावीच्या निकालात यंदाही बीड जिल्हा औरंगाबाद बोर्डात पहिला आला असून जिल्ह्याचा निकाल ९२.५४ टक्के लागला आहे. यंदा बीड जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील ६३५ शाळेतून दहावीच्या परीक्षेसाठी  २६ हजार ६३ मुले, १८ हजार २९४ मुली असे एकूण ४४ हजार ३५७ विद्यार्थ्यांनी  परीक्षेची नोंदणी केली होती. त्यापैकी २५ हजार ८८० मुले व १८ हजार १६२  मुली  असे एकूण ४४ हजार ४२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी यात २३ हजार ५१७ मुले  व १७ हजार २३८ मुली असे एकूण ४० हजार ७५५ मुले- मुली उत्तीर्ण झाली आहेत. मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९०.८७ टक्के तर मुलीच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९४.९१ टक्के एवढे आहे.  ११ तालुक्यांत  प्रत्येक वर्षी   पहिला येणारा बीड तालुका  यंदा दुसऱ्या स्थानावर राहिला अाहे. 

 

विभागात सर्वात कमी निकाल

हिंगोली : जिल्ह्याचा  दहावीचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत सहा टक्के कमी लागला असून या वर्षीचा निकाल ७५.३० टक्के एवढा लागला आहे. हा निकाल औरंगाबाद विभागात सर्वात कमी  आहे. दहावीच्या परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यात १८ हजार ९६७ परीक्षार्थींनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १८ हजार ५३९ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. आज घोषित झालेल्या निकालात २ हजार २६२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर ४ हजार ५२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ५ हजार २९९ द्वितीय श्रेणीत  उत्तीर्ण झाले असून १९२० विद्यार्थी केवळ उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी झाले आहेत. हिंगोली जिल्ह्याचा निकाल विभागात सर्वात कमी लागला आहे. 

 

जिल्ह्यात मुलींनी मारली बाजी

औरंगाबाद : यंदाच्या दहावीच्या निकालातही मुलींनी बाजी राखली.   औरंगाबाद जिल्ह्यातून ९३.६८ टक्के मुली आणि ८८.६६ टक्के मुले उत्तीर्ण झाली आहेत. औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९०.८५ टक्के आहे. जिल्ह्यातील २०१३४ विद्यार्थी प्राविण्य तर २३७९१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उतीर्ण, ५४१९ विद्यार्थ्यांना कला व क्रीडा गुणांचा फायदा मिळाल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव सुगता पुन्ने यांनी पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे बहुतांश विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या गणित विषयात राज्यातील ८९.१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.    
 यंदाचा निकाल चांगला असून, मुलींच्या निकालात मागील वर्षीच्या तुलनेत ५.९६ टक्क्यांनी वाढ झाली.

 

पुन्हा मुलींचा टक्का वाढला

परभणी : जिल्ह्याचा एकूण निकाल ८४.३९ टक्के लागला असून त्यात मुलींचें प्रमाण ८८.९८ टक्के इतके आहे. मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८१.११ टक्के आहे. ३९ शाळांनी १०० टक्के निकाल घेत आपला वरचष्मा राखला. जिल्ह्यात परभणी तालुक्याने अव्वल क्रमांक पटकावला. तालुक्याचा निकाल ८७.६९ टक्के इतका आहे. चार शाळांना मात्र भोपळा मिळाला.  यावर्षी   जिल्ह्यातील ४२५ शाळांतील २९ हजार ६१३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी प्रवेश भरले होते. त्यापैकी २९३२३ परीक्षार्थीनी परीक्षा दिली. यामध्ये १७११३ मुलांनी तर १२२१० मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २४७४५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात १३८८० मुलींचा तर १०८६५ मुलांचा समावेश आहे.  

 

निकाल ८३ % मुखेड तालुका अव्वल

नांदेड: माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत दहावीचा निकाल शुक्रवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला आहे. यात १२ वी पाठोपाठ दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्याचा सरासरी निकाल ८३.०३ टक्के इतका लागला आहे. सलग दुसऱ्या वर्षी मुखेड तालुक्याचा ९३.०२ टक्के निकाल लागला असून तालुका जिल्ह्यात पहिला आला आहेे.   ६५१ परीक्षा केंद्रावर ४५ हजार ७५१ परीक्षार्थ्यांनी परीक्षा दिली होती. २४ हजार ७०८ विद्यार्थी तर २१ हजार ४५५ विद्यार्थिनींनी परीक्षेसाठी फाॅर्म भरला होता. असे एकूण ४६ हजार १६३ विद्यार्थी होते. त्यापैकी २४ हजार ४२९ विद्यार्थी तर २१ हजार ३२२ विद्यार्थिनींनी परीक्षा दिली.   त्यापैकी १९ हजार ५६० विद्यार्थी तर १८ हजार ४२६ विद्यार्थिनी दहावीच्या परीक्षेत पास झाल्या आहेत.

 

कॉपीमुक्ती अभियानामुळे निकाल वधारला 

उस्मानाबाद : कॉपीमुक्ती अभियानामुळे गतवर्षी ढेपाळलेला १० वीचा निकाल यावेळी सावरला आहे. यावर्षी ८५.६६ टक्के निकाल लागला असून गतवर्षीपेक्षा ३.१९ टक्क्याने वाढ झाली आहे. विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १२२८ ने वाढ आली आहे. दोन वर्षांपासून होणारी निकालाची घसरण थांबली आहे.  मुली व मुलांमधील उत्तीर्णांची तफावत यावेळी तीन टक्क्यांनी कमी झाली आहे. यावेळी ७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या.   जिल्ह्यात २३ हजार १५७ विद्यार्थ्यांनी यावेळी परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, २२ हजार ९६० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी १९ हजर ६६८ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. गतवर्षी ८२.४७ टक्के निकाल लागला होता. यामध्ये ३.१९ टक्के अधिक निकाल लागला. २०१६ मध्ये ८५.६२ टक्के निकाल होता.  


मार्च २०१७ च्या निकालाच्या तुलनेत विशेष प्रावीण्य मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १२२८ ने वाढली आहे. गतवर्षी ३८३८ विद्यार्थी विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाले होते. यावेळी ही संख्या वाढून ५०५६ झाली आहे. तसेच प्रथमश्रेणी म्हणजे ६० टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांमध्येही विशेष वाढ झाली नाही.  

 

बातम्या आणखी आहेत...