आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद पोटनिवडणूक: ‘बीड-उस्मानाबाद-लातूर’ची मतमाेजणी 11 जूनपूर्वी हाेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - बीड-उस्मानाबाद-लातूर विधान परिषद निवडणूक प्रक्रिया ११ जूनपर्यंत पूर्ण करावी, असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले. मात्र, अायाेगाचा अादेशानुसारच मतमोजणीची तारीख निश्चित हाेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली. मतदान २१ मे रोजी घेण्यात आले. २४ मे रोजी मतमोजणी होऊन   निकाल अपेक्षित होता.

 

मात्र, बीडच्या ११ नगरसेवकांना अपात्र ठरवणे व त्यांच्या मतदानाची माेजणी करण्यासंदर्भात खंडपीठाने निर्देश दिल्यामुळे या मतदारसंघाची मतमाेजणी स्थगित केली हाेती. या नगरसेवकांच्या याचिकेवर अाता ६ जून राेजी खंडपीठात सुनावणी हाेणार अाहे. न्यायालयाच्या अादेशानंतरच मतमाेजणीची तारीख निश्चित होईल.

 

बातम्या आणखी आहेत...