आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये भाजप किसान मोर्चाचे शेतकऱ्यांच्या व्यक्तीगत लाभाच्या योजना बंद असल्याने आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड-  बीड पंचायत समितीमध्ये अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या व्यक्तीगत लाभाच्या सिंचनविहिरीची व इतर कामे जाणीवपूर्वक बंद असल्यामुळे संपूर्ण बीड तालुक्यात संतापाची लाट पसरली आहे. याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही काहीच दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पंचायत समितीचे कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात बीडीओ हजर नसल्यामुळे त्यांच्या खुर्चीला साडीचोळी व बांगड्याचा हार घालून शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला. यावेळी बाळासाहेब मोरे यांच्यासह विष्णू येडे, रेवण मोरे, आशिष येडे, बाळासिंह परदेशी, संभाजी कदम, राऊत मामा, उमेश येडे, जनक मोरे यांच्यासह उपस्थित होते.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो

बातम्या आणखी आहेत...