आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईलच्या बॅटरीशी खेळताना स्फोट, दहा वर्षाच्या मुलाच्या हाताची बोटं तुटली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- मोबाईलच्या बॅटरीशी खेळताना स्फोट होऊन दहा वर्षाच्या मुलाच्या हाताची बोटं तुटल्याची घटना जालन्यात घडली आहे. उमेश राठोड असे जखमी झालेल्या मुलाले नाव असून त्याच्यावर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


सविस्तर वृत्त असे की, आई-वडिल घरी नसताना दुपारच्या वेळी उमेश राठोड आपल्या लहान भावासोबत खेळत होता. मुलांनी खेळण्यात असलेली मोबाईलची बॅटरी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बॅटरीचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट एवढा भीषण होता की, यामध्ये मोठा मुलगा उमेशच्या हाताची बोटे अक्षरश: तुटली, त्याच्या चेहऱ्यालाही दुखापत झाली आहे. जालना जिल्ह्यातील कोकाटे हदगाव इथे ही धक्कादायक घटना घडली. 

बातम्या आणखी आहेत...