आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेशनकार्डासाठी लाच घेतली; लिपिक अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- तीन भावांचे तीन वेगवेगळे रेशनकार्ड देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी करून २८०० रुपयांची लाच घेणारा  पाथरी तहसील कार्यालयातील अव्वल कारकून भारत कचरू घनसावध (५१) यास शुक्रवारी (दि.१६) सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने रंगेहाथ पकडले.  


 रेणापूर (ता.पाथरी) येथील   विभक्त झालेल्या तीन  भावांना त्यांचे वेगवेगळे रेशनकार्ड काढावयाचे होते. त्यासाठी एका भावाने पाथरी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अव्वल कारकून भारत घनसावध यांच्याशी दोन महिन्यांपूर्वी संपर्क साधला.  घनसावध याने त्यांना प्रत्येक रेशनकार्डासाठी एक हजार रुपये याप्रमाणे तीन हजार रुपयांची मागणी केली. त्यावर संबंधित ग्रामस्थाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबतची तक्रार दाखल केली होती.  


या तक्रारीच्या अनुषंगाने  शुक्रवारी सकाळी पाथरी तहसीलमध्ये सापळा रचून घनसावध याला  २८०० रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. याप्रकरणी पाथरी पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे उपअधीक्षक एन.एन.बेंबडे, निरीक्षक विवेकानंद भारती, अनिल गव्हाणकर, हवालदार लक्ष्मण मुरकुटे, जहागीरदार, अनिल कटारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...