आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड (सावित्रीबाई फुले साहित्यनगरी)- शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवतानाच शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, मराठी शाळांना प्राधान्याने मंजूरी द्यावी, विधान मंडळ, संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण द्यावे, १३०० शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, या प्रमुख ठरावांसह एकूण नऊ ठराव आठव्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनात मंजूर करण्यात आले.
देशाचा अन्नदाता असलेल्या बळीराजाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, गावपातळीवर शाळांना मंजूरी देताना मराठी शाळांना प्राधान्य द्यावे, या प्रमुख ठरावांसह इतर नऊ ठराव आठव्या मराठवाडा लेखिका संमेलनात साहित्यिक, रसिकांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.
दिवंगत महनीय व्यक्तींना श्रद्धांजली
अभिनेते शशी कपूर, लेखिका शिरीष पै, रंगकर्मी डॉ.रुस्तुम अचलखांब, पत्रकार गौरी लंकेश, डॉ.एलिनॉर झेलिएट, कवी गजमल माळी, समीक्षक एस.एस.भोसले, डॉ.कृष्णा किरवले, चंद्रकांत देवताळे, विचारवंत डॉ.मुं.ब.शहा, रिमा लागू, प्रकाश काळे, अरूण साधू, भीमराव गस्ती, अश्विनी एकबोटे, किशोरी आमोणकर, सैफोद्दीन डागर, श्रीराम गोजमगुंडे, सदाशिव आतकरे, प्रा.दिनकर बोरीकर, प्रा.ना.स.फरांदे, बापू विरू वाटेगावकर, डॉ.भालचंद्र देशपांडे, डॉ.श्रीराम गंुदेकर, के.टी.तांदळे आदी दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करा
राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती बिकट झाली असून सर्वपक्षीय राजकारणी शेतकरी प्रश्नी उदासिन आहेत. त्यामुळे मराठवाड्यात व विदर्भात शेतकरी आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा, नवव्या शेड्यूल्ड अंतर्गत येणारे सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत हा ठराव कौतिकराव ठाले पाटील यांनी मांडला.
मराठी शाळांना प्राधान्य मंजुरी दिली जावी
मराठी भाषा आणि संस्कृती संवर्धित करण्याची जबाबदारी साहित्यसंस्थांसह सरकारचीही आहे. त्यामुळे गावपातळीवर शाळा मंजूर करताना मराठी शाळांनाच प्राधान्याने मंजूरी दिलीजावी. उद्योजकांच्या शाळांना मान्यता देताना त्या मराठी माध्यमांच्याच असाव्यात, असे बंधन घालावे, असा ठराव प्रा.किरण सगर यांनी मांडला.
इंग्रजी शाळांत मराठीला प्रथम दर्जा द्यावा
इंग्रजी शाळांमध्ये मराठीचे शिक्षण देताना तिचा समावेश ‘द्वितीय भाषा’ ऐवजी प्रथम भाषा असा करावा.
मसाप शाखेला विनामूल्य जागा द्यावी
‘मसाप’ ही संस्था वाड्मयीन व सांस्कृतिक भरणापोषणासाठी कार्य करत आहे. बीड पालिकेने बीड शाखेसाठी विनामुल्य जागा उपलब्ध करुन द्यावी, असा ठराव संमेलनाध्यक्ष डॉ.दीपा क्षीरसागरांनी मांडला
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.