आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक मेटेंच्‍या मंत्रीपदावर मुख्‍यमंत्र्यांचे मौन;शिरुर तालूक्‍यात विकास कामांचे उद्घाटन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजपचा मित्र पक्ष असलेल्‍या शिवसंग्राम पक्षाचे अध्‍यक्ष आमदार विनाक मेटे यांचे मंत्रीपदाचे स्‍वप्न अजून अंधारातच असल्‍याचे दिसते. मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी बीड जील्‍ह्यातील शिरुर तालूक्‍यात विविध विकास कामांचे उद्घाटन करण्‍यासाठी आले होते. आमदार विनायक मेटे यांच्‍या मंत्रीपदाबाबत ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले होते. मात्र त्‍यांनी विषयाला बगल देत मेंटे यांच्‍या मंत्रीपदाबाबत बोलनेच टाळले. 


शिरूर तालुक्यातील नारायणगडावर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या हस्‍ते विकास कामांचे भुमीपुजन करण्‍यात आले. मुख्यमंत्री झाल्यांनतर ते पहिल्यांदाच नारायणगडावर आले होते. यावेळी मेटे यांच्या विषयी बोलतांना ते म्‍हणले की, मेटे व मी गुरूशिष्य नसुन उत्तम मित्र आहोत आणि जन्‍मभर मित्र राहू. नगद नारायणांचा आशीर्वाद मिळाला त्यामुळेच मला मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाली, महाराष्ट्रात आमची सत्ता आली. गडाचा विकास करण्यास आम्ही कटीबध्द आहोत. या गडावर नगदनारायणांची समाधी असल्याने येथे सर्व काही नगदच द्यावे लागते. त्यामुळे आपण गडावर  उधार जायचे नाही. हे ठरवले होते. या गडाच्या विकासासाठी अधी पैसे देवु नंतर भेट देवु असे ठरवले. आज २५ कोटी रूपयांच्या विविध  विकास कामाच्या भुमीपुजनासाठी येता आले. असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. गडाचे विश्वस्त माजी आमदार राजेंद्र जगताप यांनी  मेटे यांना मंत्रीपद दिले जावे यासाठी मुख्‍यमंत्र्यांना साकडे घातले.