आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोंडअळीमुळे नुकसान; महिकोवर गुन्हा दाखल; मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी दिली पोलिसात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- बोंडअळीने झालेल्या नुकसानीमुळे महिको कंपनीवर बदनापूर ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. मंडळ कृषी अधिकाऱ्यांनीच तक्रार दिली. अशोक मुटकुळेंनी महिकोचे बीजी-२ बियाणे लावले. मात्र बोंडअळीने नुकसान झाल्याचे मुटकुळे यांनी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सायप्पा गरंडे यांच्या पंचनाम्यात ७०% नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. दाभाडीच्या मंडळ कृषी अधिकारी व्ही.एन.नरवडे यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.  पोलिसांनी शुक्रवारी महिकोला पत्र दिले. यासाठी कुणाला जबाबदार धरायचे, असा प्रश्न केला. कंपनीने माहिती दिल्यावर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पीआय रामेश्वर खनाळ यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...