आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ तरुणाचा मृतदेह 24 तासांनंतर सापडला; पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बुडून मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेलू- पोहण्यासाठी गेलेल्या तीन तरुणांपैकी एक जण पाण्यात बुडून मृत्यू पावल्याची घटना रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ब्रह्मवाकडी (तालुका सेलू) येथील लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाशयात अनिल रमेश डहाळे (२४) या युवकाचा मृत्यू झाला.जलाशयात या युवकाचा शोध घेतला परंतु मृतदेह सापडला नाही. दरम्यान,  सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास तब्बल चोवीस तासांनंतर त्याचा मृतदेह सापडला. 


रविवारी लोअर दुधना धरणात पोहण्यासाठी तीन तरुणांनी  धरणाच्या भिंतीवर प्रवेश केला. यापैकी अनिल रमेश डहाळे हा पाण्यात बुडाला.   शोध घेऊनही मृतदेह सापडला नव्हता. अंधार झाल्याने सर्वजण निघून गेले होते. सोमवारी सकाळपासूनच पुन्हा शोध सुरू केला होता. एका  युवकाने पाण्यात उडी मारून  युवकाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. यानंतर सेलू उपजिल्हा रुग्णालयात वविच्छेदनानंतर  मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...