आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीचे उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड 1 लाख रुपयांची लाच घेताना अटकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- एका शेतकऱ्याकडून एक लाख रुपयाची लाच घेतताना उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. 


एका शेतकऱ्याची जमीन पाझर तलावासाठी संपादित करण्यात आली. त्या कामाचा मावेजा देण्याकरिता संयुक्त अहवाल पाठवण्यासाठी येथील जिल्हा भूसंपादन कार्यालयातील अतिरिक्त कारभार पाहणारे तथा रोहयो उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड यांनी संबंधित शेतकऱ्यास दोन लाख रुपयांची लाच मागितली. अखेर तडजोडीतून एक लाख रुपये देण्याचे ठरले. लगेच संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पथकाने सापळा रचत ती रक्कम मंगळवारी स्वतःच्या कक्षात स्वीकारताना गायकवाड यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 


दरम्यान या कार्यवाहीत पोलिस अधीक्षक संजय लाठकर यांच्या मार्गदर्शनाखाली उप अधीक्षक एन.एन.बेंबडे, निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती, लक्ष्मीकांत मुरकुटे, जमील जहागीरदार, सचिन गुडसुरकर, शेख मुखीद, अनिल कटारे, अविनाश पवार, माणिक चट्टे, सारिका टेहेरे, भालचंद्र बोके, रमेश चौधरी यांनी सहभाग नोंदवला.

बातम्या आणखी आहेत...