आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपला रोखण्याची ताकद विरोधकांत नाही : शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - भाजपवर काही मित्र पक्षांची नाराजी आहे आणि ते काही झाकून राहिले नाही. असे असले तरी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या सोबत असलेल्या घटक पक्षांना सत्तेत येण्यापासून रोखण्याची ताकद, काँग्रेस वा इतर कोणत्याच विरोधी पक्षाकडे सध्या नाही, असा दावा करत शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटे यांनी भाजपची पाठराखण केली. 


वाशीम येथे एका खासगी कार्यक्रमाला जात असताना त्यांनी येथील विश्रामगृहात शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी आपण खासगी कार्यक्रमाला जात असून काही  बोलणार नसल्याचे सांगितले. परंतु त्यांना शिवाजी महाराज स्मारकाबाबत विचारणा केली, असता त्यांनी सांगितले की शिवस्मारकाचे काम एलअँडटी कंपनीला देण्यात आले असून येत्या २ महिन्यांत कामाची निविदा  निघणार आहे. तर भाजपवरील शिवसेनेची असलेली नाराजी आणि काही मित्र पक्षांनी सोडलेली साथ, लोकांची नाराजी या स्थितीत आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये आपली काय भूमिका असेल असे विचारले असता त्यांनी सांगितले की, काही मित्र पक्षांची भाजपवर नाराजी आहे.  परंतु, भाजपला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या पक्षांना सत्तेत जाण्यापासून रोखण्याची ताकद काँग्रेस किंवा अन्य कोणत्याही पक्षात उरली नाही, असा दावाही त्यांनी  केला. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत येईल असा कोणीही अंदाज बांधला नव्हता. 

 

बातम्या आणखी आहेत...