आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीर वीटभट्टीवर तर चित्त अभ्यासावर; मजूर म्हणून काम करीत केला सीए होण्याचा पराक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- सूर्य उगवायच्या पूर्वी कामाला लागायचं अन् अंधार पडल्यावरच काम थांबवायचं यापुढे काही जग असतं हे ठाऊक नसणाऱ्या मोसीन शेख या तरुणाने विटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत सीए होण्याचा पराक्रम केला आहे. विशेष म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंतही तो विटभट्टीवर मजूर म्हणून काम करीत होता. त्याचं शरीर दिवसभर भट्टीवरच्या कामात गुंतलेलं असलं तरी त्याचं सगळं चित्त अभ्यासात लागलेलं असायचं.


दोन दिवसांपूर्वी सीए परीक्षांचे निकाल लागले अन् लातूरच्या शारदानगर परिसरात असलेल्या विटभट्टीवर आनंदोत्सव साजरा झाला. मध्यमवर्गीय मंडळी सीए परीक्षेकडे अजूनही अवघड म्हणून पाहतात. त्यामुळे विटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराने सीए होण्याचे स्वप्न पाहिले हेच मुळात  नवल म्हणावे लागले. शारदानगर परिसरातल्या विटभट्टीवर काम करणाऱ्या महेबूब शेख यांनी आपल्या मुलांना शाळेत घातले. 


आपण शिकलो नाही मुले तरी शिकतील अन् कष्टाच्या कामापासून सुटका मिळेल असे त्यांना वाटायचे. तरीही मोठा मुलगा फारुख शिकला नाही. लहानग्या मोसीनला मात्र शिक्षणाची गोडी लागली. दहावीला ७३ टक्के मिळाल्यानंतर पुढे काय करायचे हे माहीत नव्हते. शाहू कॉलेज चांगले म्हणून तिथे गेल्यावर विज्ञान शाखेला प्रवेश मिळाला नाही म्हणून कॉमर्स घेतले. पुढे बीकॉम कलें. यापुढे शिकल्यावर सीए होता येत ही मािहती मोसीनला मिळाली. लातूरचे सीए सचिन शिंदे यांच्याकडे तो गेल्यानंतर त्यांनी मोसीनला परीक्षेचे स्वरूप, त्याचा अभ्यास, त्यातील बारकावे समजावून सांगितले. 


आनंदाचा सूर्य उगवला : मोसीन शेख
मी लहानपणापासून पाहत आलोय की सूर्य उगवायच्या पूर्वीच आई, वडील भट्टीवर कामाला लागलेले असायचे.  मला शाळेची गोडी लागली. त्यामुळे बाहेरच्या जगाशी संपर्क आला. अन्यथा माझेही आयुष्य विटभट्टीवरच गेले असते.  मी सीएची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझ्या आयुष्यात आनंदाचा सूर्य उगवला. शिक्षणामुळेच प्रगती होऊ शकते हे कळाल्यामुळे त्याच्यावरच लक्ष केंद्रित केले.  

बातम्या आणखी आहेत...