आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक लाखाची लाच घेतली, वीज अभियंत्यावर गुन्हा; वीज कर्मचाऱ्यासह गुत्तेदार अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद / नळदुर्ग- ट्रान्सफाॅर्मरच्या कामासाठी गुत्तेदारामार्फत शेतकऱ्याकडून १ लाखाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या अभियंत्यासह तिघांवर शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात अाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने उमरगा तालुक्यातील मुरूममोड येथे ही कारवाई केली.

  
जळकोटजवळील एका द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याच्या शेतातील ट्रान्सफाॅर्मर दुरुस्त करणे किंवा नवीन बसवण्यासाठी सहायक अभियंता सुधीर त्र्यंबक बुरनापल्ले याने सरदार खान पठाण व इलेक्ट्रिकल गुत्तेदार पांडुरंग जाधव यांच्यामार्फत शेतकऱ्याकडे दीड लाखाची लाच मागितली हाेती. 

 

पाच दिवस पडताळणी करून कारवाई  
संबंधित शेतकऱ्याची तक्रार अाल्यानंतर . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पाच दिवस त्याची शहानिशा केली.  २९ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीनही आरोपींनी तक्रारदाराकडे पैशाची मागणी केल्याचे समोर आल्यानंतर शुक्रवारी कारवाई करण्यात अाली. यापैकी दाेघांना अटक करण्यात अाली, तर मुख्य संशयित फरार अाहे.

बातम्या आणखी आहेत...