आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचा ‘प्रायाेजित’ साधू, प्रवक्ता नाही; जालन्यात योगगुरू रामदेव बाबा यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- याेग शिबिराच्या माध्यमातून देशभरातील अनेक ठिकाणी जाणे हाेते. अायाेजकांच्या माध्यमातून राजकीय पक्षांशीही संबंध येताे. मात्र या पक्षांशी माझी बांधिलकी असल्याचे बाेलले जाते. काही जण मला भाजपचा राजकीय साधू म्हणतात. 


  परंतु, मी काेणत्याही पक्षासाठी नाही तर भारत सशक्त करण्यासाठी लढत अाहे. साेनिया अाणि राहुल गांधी यांनी अमेठीमध्ये याेग शिबिर घेऊन मला बाेलावले तरी अापण याेग शिकवण्यास तयार अाहे, असे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी व्यक्त केले.


 भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी शिबिर अायाेजित करून मला जालन्यात बाेलावले असले तरी अापण भाजपचा ‘स्पाॅन्सर’ साधू हाेणार नसल्याचेही रामदेव म्हणाले.  
२४ फेब्रुवारीपासून तीन दिवस बाबा रामदेव यांच्या उपस्थितीत जालना येथील शहरातील मंठा चौफुलीजवळील कलश सिडस येथे याेग शिबिर हाेत अाहे. त्याच्या पूर्वसंध्येला बाबा रामदेव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. याेग पासून ते बांगलादेशी घुसखाेरीपर्यंत त्यांनी मत व्यक्त केले. इस्लाम धर्म उदयास अाला नव्हता त्या काळापासून याेग अस्तित्वात अाहे. याेगामुळे अनेक असाध्य अाजार बरे हाेत असल्याची अनुभूती अनेकांना अाली अाहे. याेग ही भारताची मुळ संस्कृती असल्याचे रामदेव म्हणाले.या वेळी मोठ्या प्रमाणात योगप्रेमींची उपस्थिती होती.  

 

रोहिंग्यांवर नियंत्रण हवे

बांगलादेशातून येणाऱ्या राेहिंग्या मुस्लिमांपासून भारत देशाला धाेका अाहे. या घुसखाेरीवर सरकारने नियंत्रण अाणण्याची गरज असल्याचे योग गुरू रामदेवबाबा यांनी यावेळी सांगितले. काश्मीरमधील हिंसाचारासह दहशतवादावर रामदेव यांनी चिंता व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...