आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बनावट कागदपत्रे, 36 लाख रुपयांचा अपहार; तत्कालीन सीईओसह 13 जणांविरुद्ध समन्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- माजलगाव येथील पंचायत समिती निवासस्थाने व कार्यालयात विविध योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे विकास कामे न करताच  ३६ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार  केल्याच्या आरोपावरून जिल्हा परिषदेचे तत्कालीन सीईओ, कॅफो, एक कार्यकारी अभियंता, दोन शाखा अभियंता, एक सेवानिवृत्त अभियंता अशा एकूण तेरा जणांविरुद्ध समन्स बजावण्यात आले असून येत्या  ६ जानेवारी २०१८ रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश  देण्यात आले. त्याच बरोबर  उर्वरित कामाची  फेरतपासणी  करण्यात येणार आहे. 


येथील पंचायत समिती निवासस्थाने व कार्यालयात विविध योजनेअंतर्गत बनावट कागदपत्रांच्या आधारे विकासकामे न करताच केलेल्या   भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारदार  गणेश साहेबराव लांडगे व त्यांचे सहकारी सुनील मोतीराम शिंदे, सुरेश देविदास सिरसट यांनी   प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी  भारत वि.बुरांडे  यांच्या न्यायालयात अर्ज दाखल 
केला होता. 


सन २०१२ ते २०१५  या काळात  जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव नन्नावरे, तत्कालीन मुख्य लेखा वित्त अधिकारी वसंत जाधवर, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता एस.डी.काकड, माजलगाव येथील जिल्हा परिषद बांधकाम  उपविभागाचे शाखा अभियंता रामराव गुंडेराव कुलकर्णी, माजलगाव येथील जिल्हा परिषद  बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता  नरसिंग आशान्न एनगंठवार, जिल्हा परिषद उपविभागाचे सेवानिवृत्त उपअभियंता श्रीकांत मुळाटे, कुंभेफळ येथील मजूर सहकारी संस्थेचे अध्यक्ष भगवान थोरात, सचिव राहुल भगवान थोरात,  स्नेहन सतीश दांगट, गहिनीनाथ कुंडलिक सिरसाट,  दादासाहेब भीमराव बोरखेडे, शीला मदन सोळंके, महेश लक्ष्मण चंदनशिव यांनी संगनमताने बनावट दस्ताआधारे विविध योजनेअंतर्गत शासनाची फसवणूक करून  ३६ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार  केल्याची तक्रार दिली होती.

बातम्या आणखी आहेत...