आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेवराईत कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; बँकेसह खासगी सावकारे होते कर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- बँकेसह खाजगी सावकाराचे पाच लाखाचे कर्ज कसे फेडणार या चिंतेतील कर्जबाजारी शेतकऱ्याने  लिंबाच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक गावात  मंगळवारी सकाळी उघडकीस आली. शंकर त्रिंबकराव जाधव (वय ५० रा.पाथरवाला बुद्रुक ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  


तालुक्यातील  पाथरवाला बुद्रुक  येथील शेतकरी शंकर जाधव यांना सोडेतीन एकर कोरडवाहु शेती असुन  त्यांनी शेतीसाठी  भारतीय स्टेंट बँकेकडून  २ लाख,  जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून  १ लाख  असे बँकेकडील तीन लाख व  खासगी सावकाराकडून २ लाख असे एकुण पाच लाखाचे कर्ज घेतले होते.  कर्ज कसे फेडावे या चिंतेतच जाधव यांनी गावातील दामोदर  मस्के यांच्या शेतातिल लिंबाच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली. मंगळवारी  सकाळी  ग्रामस्थांनी  पोलीसांनी  माहिती दिली. यांनतर पोलिसांनी पंचनामा करून शेतकऱ्याचा मृतदेह  नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शेतकऱ्याच्या पश्चात  एक मुलगा, एक मुलगी ,पत्नी ,आई -वडील असा परिवार आहे . सदरील शेतकऱ्याची मुलगी अविवाहीत असुन तिच्या विवाहासाठी ठिकाणे पाहण्याची तयारी सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...