आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापुढील काळ काँग्रेस पक्षाचा असेल- थोरात; लातूर तालुक्यातील सरपंच, उपसरपंचांचा सत्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- काँग्रेस पक्षासाठी सध्या कठीण काळ आहे. पण सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारचा कारभार पाहिला तर पुढचा काळ काँग्रेसचाच राहणार, असे मत  व्यक्त करीत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात आशावाद पेरला. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मंगळवारी लातूर तालुक्यातील नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. आमदार अमित देशमुख, बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  


बाळासाहेब थोरात म्हणाले की,  निवडणुकीतील मतभेद निवडणुकी पुरतेच मर्यादित ठेऊन सरकारी योजनांचा अभ्यास करून एकसंघपणे गावचा विकास साधावा.  सध्याचे सरकार एकही नवीन योजना आणू शकले नाही. गुजरातच्या निवडणुकीने राहुल गांधींचे नेतृत्व  सिद्ध केले आहे. या नेतृत्वाला ताकद देण्याची जबाबदारी आपली आहे.

 

बापटांच्या भविष्याला पंचांगाची गरज नाही  
सध्याचे सरकार काहीच काम करीत नाही. त्यामुळे बदलांची चाहूल लागत आहे. मंत्री गिरीश बापट यांनी वर्षभरात नवे सरकार असेल ही भविष्यवाणी केली आहे. ती खरी ठरणार का हे पाहण्यासाठी कोणत्याही पंचांगांची गरज नाही, अशी मिश्कील टीका आ. अमित देशमुख यांनी  केली.  

बातम्या आणखी आहेत...