आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणी जिल्हा रुग्णालयातील लसपुरवठा विभागास आग; जुनी मशिनरी व कागदपत्रे जळून खाक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील लस पुरवठा  विभागास मंगळवार दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जुनी मशिनरी व कागदपत्रे जळून खाक झाली.अग्निशमन दलाच्या बंबाने अवघ्या तासाभरात आग आटोक्यात आणली.    


जिल्ह्यातील आरोग्य संस्थांना लसीचा पुरवठा करण्यासाठीचा विभाग शीतसाखळी हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अपघात विभागाच्या समोर आहे. जुन्या इमारतीत स्वतंत्र्यरीत्या हा विभाग असून या ठिकाणी लसींचा साठा योग्य त्या तापमानाखाली सुरक्षितरीत्या ठेवण्यासाठी शीतगृह आहे. या शीतगृहाच्या बाजूच्या खोलीत वर्षानुवर्षे वापरलेली जुनी यंत्रे ठेवलेली आहेत. मात्र शीतगृहाच्या समोरच्या भागात असलेल्या विद्युत यंत्रणेमध्ये मंगळवारी सकाळी नऊच्या सुमारास शॉर्टसर्किट झाले. त्यात संपूर्ण विद्युत यंत्रणा जळून खाक झाली तर जुनी कागदपत्रे व यंत्रे असलेली खोली पूर्णतः जळून खाक झाली. शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराच्या निमित्ताने या विभागातील कर्मचारी शिबिरस्थळी होते. त्यांना ही घटना समजताच ते तातडीने दाखल झाले. तत्पूर्वी अग्निशमन दलाच्या जवानांनी या इमारतीचा विद्युत पुरवठा खंडित करून आग आटोक्यात आणली. शीतगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने शीतगृहातील लसी महापालिकेच्या रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयातील शीतगृहात तातडीने हलवल्याने ते सुरक्षित राहिले असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झालेली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...