आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी (दि.२०) आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. येत्या दोन दिवसांत कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी त्यांना दिले.  


मौजे धानोरा मोत्या येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या दोन अध्यक्षांवर व संचालकांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गावातील चार शेतकऱ्यांनी मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यासाठी त्यांनी अनेक वेळा निवेदने देऊन उपोषणही केले होते. या शेतकऱ्यांनी अध्यक्ष व संचालकांविरुद्ध ठोस पुरावे दिलेले असतानाही प्रशासन त्यांच्यावर काहीही कारवाई करीत नसल्याचा आरोप शेतकरी रावण बाबाराव मोहिते, कैलास चंपतराव वाघ, मारोती देवराव मोहिते, नरहरी सीताराम मोहिते या चौघांनी केला आहे. दि.१२ फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांना कारवाई करण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले होते.यात  कुठलीही कारवाई होत नसल्याने २० रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे हे चौघे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जिल्हाधिकारी पी.शिव शंकर यांनी याप्रकरणी येत्या दोन दिवसांत चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन या शेतकऱ्यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...