आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळासाठी निधी द्या, अन्यथा अांदाेलन: सुप्रीया सुळे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंदखेडराजा- राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी ३११ काेटी रुपये निधी देण्याचे अाश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले हाेते. मात्र, तीन वर्षे झाली तरी एक रुपयाही मिळालेला नाही. जर एका महिन्याच्या आत मुख्यमंत्र्यांनी ३११ कोटी रुपये निधी दिला नाही तर मी महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून १ फेब्रुवारीला मातृतीर्थावर येऊन आंदोलन करीन, असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. शुक्रवारी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे अायाेजित कार्यक्रमात त्या बाेलत हाेत्या. सुळे म्हणाल्या, मंत्री गिरीश बापट यांनी कालपरवा एक भाकीत केले की, हे सरकार बदलणार आहे. त्यामुळे ‘राजेश टोपे, तुम्ही चिंता करू नका,  शपथविधीची तयारी करा, हे सरकार ३ वर्षांपासून सतत खोटं बोलतंय.  महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. अाजवर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे चार वेळा अपघात झाले. ते कशामुळे होतात, तर त्यांची चौकशी व्हावी,’ अशी मागणीही सुळे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...