आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ गडावर लोकनेत्याच्या दर्शनासाठी उसळला जनसागर; स्व. मुंडेंना अभिवादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील दुर्घटनेमुळे गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त होणारे  सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असतानाही मुंडे  यांना अभिवादन करण्यासाठी  मंगळवारी सकाळपासून महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली.  गोपीनाथ गडावर  सुरुवातीला वैद्यनाथच्या दुर्घटनेतील मृत कर्मचाऱ्यांना  श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह खासदार  डाॅ. प्रीतम  मुंडे यांनी  कुटुंबीयांसह गडावर उपस्थित राहून सर्वांचे अभिवादन स्वीकारले. भगवानगडाहून आलेली भगवानगड ते गोपीनाथगड, नांदेड येथून हनुमानगड ते गोपीनाथगड  व शिखर शिंगणापूर ते गोपीनाथगड अशी संघर्षज्योत घेऊन हजारो  कार्यकर्ते गडावर आले होते. 

  
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या दुर्घटनेमुळे  लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने  मंगळवार १२ डिसेंबर २०१७ राेजी जयंतीदिनी  आयोजित करण्यात आलेले सामाजिक  उपक्रम रद्द  करण्यात येऊन जयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. मंगळवारी जयंती असल्याने  हजारो मुंडे अनुयायी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गडावर जमा झाले होते. यावेळी राज्याचे पशुसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे,  जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार, माजी आमदार केशवराव आंधळे, भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे, राधाताई सानप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आदित्य सारडा, बंजारा नेते मांगीलाल चव्हाण, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव अघाव, रामराव खेडकर, धम्मानंद मुंडे, भास्कर रोडे, विजय गोल्हार, संतोष हंगे, नगराध्यक्ष स्वरूपसिंह हजारी, सहाल चाऊस आदी उपस्थित होते.


लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीसमोर लाखो अनुयायांनी सकाळपासूनच नतमस्तक होण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. सकाळी पंकजा  मुंडे, खा. डाॅ. प्रीतम  मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, डाॅ. अमित पालवे, अॅड. यशश्री  मुंडे,  अगस्त्य खाडे या कुटुंबातील सदस्यांनी मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  नियोजित कार्यक्रमासाठी तयार असलेल्या मंडपात बसून  पंकजा   मुंडे व त्यांच्या  परिवाराने सर्वांचे अभिवादन स्वीकारले.

 

रथयात्रा, संघर्षज्याेतीचे गडावर स्वागत    
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या वतीने रथयात्रा व संघर्षज्योतीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भगवानगडाहून आलेली भगवानगड ते गोपीनाथगड, नांदेड येथून हनुमानगड ते गोपीनाथगड अशी अॅड. रमेश धात्रक यांनी रथयात्रा  काढली होती. डाॅ. राजेंद्र खाडे यांच्या नेतृत्वाखाली शिखर शिंगणापूर ते गोपीनाथगड अशी संघर्षज्योत घेऊन कार्यकर्ते  गोपीनाथ गडावर आले होते. या दोन्ही यात्रांचे पंकजा मुंडे, खा. डाॅ. प्रीतम  मुंडे यांनी स्वागत केले.   

बातम्या आणखी आहेत...