Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Heavy Rain In Jalna District Live Updates, Hailstrom News

जालन्यात गारपिटीमुळे 2 जणांचा मृत्यू, मंठ्यात पडल्या 34 ग्रॅम वजनाच्या गारा, पाहा PHOTOS

प्रतिनिधी | Feb 12, 2018, 14:30 PM IST

जालना- हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत आज जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाची जोरदार सुरुवात झाली, मंठा, आंबड तालुक्यात काही गावात सकाळी ढगाळ वातावरण व वादळी वाऱ्यासह गारांचा वर्षाव सुरु झाला, यामुळे सर्वत्र शेतकऱ्याची एकच धावपळ सुरू झाली. उघड्या मैदानातील लोक मिळेल तेथे आश्रय घेऊन थांबले.

मंठा येथे पडलेल्या एका गार गोळीचे वजन 34 ग्रॅम भरले आहे. गारांचा वर्षाव झाल्याने या भागातील रब्बी हंगामातील उभा गहू, हरभरा, फरदड कापूस, फळबागा, आंबा, ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, महसूल यंत्रणा सक्रिय झाली असून सर्वत्र झालेल्या गारपिटीची माहिती व नुकसानीचे आकडेवारी घेणे सुरु आहे.

जालना जिल्ह्यातील मंठा येथे आज सकाळी झालेल्या गारपिटीत मोठे नुकसान झाले आहे, जालना जिंतूर रोडवरील बालाजी व सूरज इंडस्ट्रीजमध्ये कापूस, रुई व सरकीचे नुकसान झाले आहे, अशी माहिती जिनिंग संचालक रणजित डेडवाल यांनी सांगितली, सकाळी पडलेल्या एका गारीच्या गोल गोळ्याचे वजन केले असता 34 ग्रॅम भरले. बोर, आवळा, आकाराच्या गारांचा वर्षाव झाल्याची माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे. जालना तालुक्यातील वंजार उमरद गावात गारा अंगावर पडल्यामुळे 70 वर्षीय नामदेव शिंदे या वृद्धाचा मृत्यू झाला. नामदेव शिंदे शेतात जात असताना त्यांना गारांचा मार बसला. जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील निवडुंगा गावात 65 वर्षांच्या आसाराम जगताप यांचाही गारांचा मार लागून मृत्यू झाला. शौचाला जात असताना गारांच्या तडाख्यात त्यांचा मृत्यू झाला.

पुढील स्लाईडवर फोटो आणि माहिती

Next Article

Recommended