आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहेरहून पैसे अाणण्यास पत्नीने दिला नकार, संतापलेल्या नवऱ्याने दिली अशी शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव- पत्नीचा खून करून पुरावा नष्ट केल्याचा अाराेप सिद्ध झाल्याने पती बाळू भीमाजी सुपनर यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १५ हजार रुपयांचा दंड ठाेठावला. बाेयेगाव (ता. नांदगाव) येथील सविताचा विवाह खादगावच्या बाळू सुपनर याच्याशी झाला हाेता. मूलबाळ हाेत नसल्याने सविताचा छळ केला जात हाेता. माहेरहून पैसे अाणण्यास नकार दिल्याने ३० जून २०१३ ला तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून देण्यात अाला हाेता.याप्रकरणी नांदगाव पाेलिस ठाण्यात पती बाळू सुपनर, भाऊ भाऊसाहेब सुपनर, नणंद पुष्पा सराेदे व नंदई भगवान सराेदे यांच्याविराेधात खुनाचा गुन्हा दाखल झाला हाेता. 
बातम्या आणखी आहेत...